Khadakpada Police : इराणी वस्तीत पोलीसांवर दगडफेक; २५ जणांविरोधात गुन्हा दाखल, चौघांना अटक

Kalyan News : आंबिवलीमधील या इराणी वस्तीतून याआधी देखील शेकडो चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनेकदा चोरट्यांना अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर इराणी जमावाकडून हल्ले देखील झाले आहेत.
Khadakpada Police
Khadakpada PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीमधून चोरट्याला ताब्यात घेऊन परतणाऱ्या पोलिसांच्या पथकावर इराणी जमावाने दगडफेक केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना खडकपाडा पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्या २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मधील चौघांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये तीन महिला आरोपी आहेत. 

आंबिवलीमधील या इराणी वस्तीतून याआधी देखील शेकडो चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनेकदा चोरट्यांना अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर इराणी जमावाकडून हल्ले देखील झाले आहेत. अशाच प्रकारे मुंबई एमआयडीसी पोलिसांचे पथक एका चोरट्याचा शोध घेत कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत पोहचले होते. चोरट्याची शोधाशोध करत असताना तौफिक नावाच्या चोरट्याला इराणी वस्तीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. 

Khadakpada Police
Shindkheda Crime News : पोलीस ठाण्याबाहेर अस्ती ठेवत निषेध आंदोलन; ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी केला पोलीस प्रशासनाचा निषेध

दरम्यान तोफिकला ताब्यात घेऊन पोलीस जात असतानाच अचानक इराणी जमावाने विरोध करत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हा हल्ला चुकवत पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले. मात्र या इराणी जमावाने रेल्वे स्थानकात देखील पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात पोलीस अधिकारी यशवंत पालवे गंभीर जखमी झाले. 

Khadakpada Police
Solar Pump : पैसे भरूनही सौरपंपाची मिळेना; वाशिम जिल्ह्यातील ३४११ शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सदर घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व वायरल व्हिडिओ आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला. यात खडकपाडा पोलिसांनी या दगडफेक करणाऱ्या २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर अवघ्या काही तासात चार जणांना बेड्या ठोकल्या आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com