Solar Pump : पैसे भरूनही सौरपंपाची मिळेना; वाशिम जिल्ह्यातील ३४११ शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Washim News : शेतीसाठी केवळ बारा तास आणि रात्रीच्यावेळी वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागते. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडून दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा होण्याची मागणी होती
Solar Pump
Solar PumpSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: महावितरणकडून शेतीसाठी केवळ बारा तास वीजपुरवठा केला जात असतो. तो देखील रात्रीच्या वेळी होत असतो. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा; म्हणून मुख्यमंत्री सौर शेतीपंप योजना हाती घेण्यात आली. मात्र या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कारण वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौरपंपासाठी पैसे भरल्यानंतर देखील पंप मिळालेले नाहीत. 

शेतीपंप वापरून त्याचे येणारे वीजबिल वेळेवर भरले जात नसल्याने थकबाकी कोट्यवधी रुपयांवर पोहचली आहे. मुख्य म्हणजे शेतीसाठी केवळ बारा तास आणि रात्रीच्यावेळी वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागते. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडून दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा होण्याची मागणी होती. यामुळे राज्य सरकारने सौरपंप योजना सुरु केली. या योजनेत मागेल त्याला सौरपंप उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे होत नसल्याचे चित्र आहे. 

Solar Pump
Bhandara News : भंडारा को- ऑपरेटिव्ह बँकेत चोरीचा प्रयत्न फसला; लॉकर न तुटल्याने रक्कम सुरक्षित

३ हजार ४११ शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा 

वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात सिंचनासाठी सौर कृषिपंप जोडणी मिळावी. यासाठी जिल्ह्यातील ८ हजार ५२६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ४ हजार ९०६ शेतकऱ्यांनी पैशांचा भरणा केला असतानाही अद्याप ३ हजार ४११ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे रब्बी हंगामात सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केल्या जात आहे.

Solar Pump
Shindkheda Crime News : पोलीस ठाण्याबाहेर अस्ती ठेवत निषेध आंदोलन; ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी केला पोलीस प्रशासनाचा निषेध

योजना केवळ कागदावर 

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप देण्याची योजना आखली आहे. मागेल त्याला सोलर पंप या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज करावयाचा आहे. त्यानुसार शेतकरी अर्ज करत आहेत. मात्र शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे शासनाची हि योजना कागदावरच राहिल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com