Shindkheda Crime News : पोलीस ठाण्याबाहेर अस्ती ठेवत निषेध आंदोलन; ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी केला पोलीस प्रशासनाचा निषेध

Dhule News : मुलीच्या कुटुंबियांना वारंवार मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी अपहरणकर्त्यांकडून दिली जात होती. या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार
Shindkheda  Police Station
Shindkheda Police StationSaam tv
Published On

धुळे : मुलीचे अपहरण करून मुलीच्याच कुटुंबियांना धमकावण्यात आले होते. या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यात काल घडली होती. यानंतर आज नातलग व ग्रामस्थांनी मृताच्या अस्ती पोलीस ठाण्याच्या बाहेर आणत पोलीस प्रशासनाचा निषेध केला आहे. 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आक्कडसे गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान या अपहरण केलेल्या मुलीच्या कुटुंबियांना वारंवार मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी अपहरणकर्त्यांकडून दिली जात होती. या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला होता.  

Shindkheda  Police Station
Jalgaon News : दुरुस्तीचे काम करत असताना अचानक निसटला ट्रॅक्टरचा जॅक; ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

पोलीस प्रशासनाचा निषेध 

गेल्या काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यानंतर वारंवार नातेवाईकांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुलीचा तपास करण्याची विनवणी केली होती. परंतु मुलीचे अपहरण होऊन तब्बल सहा महिने उलटून देखील शिंदखेडा पोलीस प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी लावला आहे. शिवाय मुलीच्या कुटुंबियांना त्रास दिला जात असल्याची देखील दाखल घेण्यात आली नाही. यातूनच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. 

Shindkheda  Police Station
Maval News : पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तरुणांवर काळाचा घाला; पवना धरणात बुडून दोघांचा मृत्यू

नातेवाईक झाले संतप्त 

दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी संबंधित मृत वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून त्यांच्या अस्ती आज थेट पोलीस ठाण्याच्या बाहेर नेऊन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात निषेध आंदोलन केला. तसेच याचा जाब विचारला आहे. तर यानंतर तरी झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त प्रश्न संतप्त कुटुंबीयांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com