Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार

Mahayuti Meeting In Delhi: काही खात्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीला जाणार आहेत.
Maharashtra Politics:  मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार
Mahayuti Meetingtimes of india
Published On

महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालाचालींना वेग आला आहे. महायुतीची बैठक होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला जाणार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी सागर बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. बराच वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर अजित पवार पुन्हा देवगिरी बंगल्यावर गेले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याध्ये चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादीसोबत बैठक झाली नव्हती. त्यामुळे आज अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीला कोणती कोणती खाती आहेत यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीमध्ये गेल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यापूर्वीच या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

Maharashtra Politics:  मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार
Maharashtra Politics: महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार कधी? गृहमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा कायम

काही खात्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे. आपल्याला कशापद्धतीने चांगली खाती मिळवता येतील यासाठी तिन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १२ आणि १३ तारखेचा नागपूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस हे नागपूरला जाणार होते. पण पुढील २-३ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics:  मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार
Maharashtra Politics : 15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी दिल्लीला जाणार आहेत. अमित शाह यांचीते सदिच्छा भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये सर्व वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर ते सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील यावेळी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. तिन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय लवकर होईल असे म्हटले जात आहे.

Maharashtra Politics:  मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार
Maharashtra Politics : ईव्हीएम मुंबईच्या समद्रात बुडवले; ठाकरे गटाचं आंदोलन,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com