AC Tips Saam Tv
बिझनेस

AC Tips: या तापमानावर चालवा 'एसी', वीजेचे बिल येणार कमी

Utility News: एका विशिष्ट तापमानावर तुम्ही एसी चालवली, तर तुम्हाला जास्त बिल येणार नाही, याचबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत..

साम टिव्ही ब्युरो

AC Tips:

उन्हाळ्याचा तडाखा हळूहळू वाढत आहे. मे आणि जून महिन्यात तापमानात आणखी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून लोक घरोघरी एसी लावत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेक दुकानांमध्ये एसीची विक्री चांगलीच वाढली आहे.

मात्र घरातील एसी चालवल्यास विजेचा प्रचंड वापर होतो. त्यामुळे दरमहा वीज बिल जास्त येते. याचा आपल्या खिशावर चांगलाच परिणाम होतो. एकीकडे उन्हाळा तर दुसरीकडे दर महिन्याला येणारे वीज बिल. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात आणि वीज वाचवण्यासाठी एसी जास्त वेळ चालवत नाहीत. तुम्हाला माहित आहे का की, एका विशिष्ट तापमानावर तुम्ही एसी चालवली, तर तुम्हाला जास्त बिल येणार नाही, याचबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

उन्हाळ्यापासून दिलासा मिळावा म्हणून अनेकजण घरातील एसी १८ अंश किंवा १६ अंशांवर चालवतात. असे केल्याने खोली लवकर थंड होते, मात्र यासाठी एसी मोठ्या प्रमाणात वीज वापरतो. यासाठी तुम्ही तुमचा एसी विशिष्ट तापमानात चालावा. विशिष्ट तापमानावर एसी चालवल्यास जास्त वीज बिल येणार नाही.

ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनुसार, एसीचे आयडियल तापमान २४ अंश सेल्सिअस आहे. जर तुम्ही तुमच्या घरात २४ अंश सेल्सिअस तापमानात एसी वापरत असाल, तर याचा तुम्हाला फायदा मिळेल.

तसेच तुमचे वीज बिल दर महिन्याला जास्त येणार नाही. याशिवाय जर तुमचा एसी ५ स्टार रेटिंगचा असेल. अशातच आणखी विजेची बचत होईल आणि तुमच्या खिशाला फटका बसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT