प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने आपल्या S1 च्या किमती कमी केल्या आहेत. अशातच इलेक्ट्रिक स्कूटर घेणं आता सामन्यांनाही परवडणार आहे. यातच ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमतीत किती रुपयांनी कमी केली आहे, हे जाणून घेऊ...
आधी Ola S1 X ची किंमत खूप स्पर्धात्मक होती. मात्र आता ओला इलेक्ट्रिक खूपच परवडणारी झाली आहे. Ola S1 X 2kWh व्हेरिएंटची किंमत किंमत आता 69,999 रुपयांपासून सुरु होते. आधी याची किंमत 79,999 रुपये होती.
तसेच S1 X 3kWh व्हेरिएंटची किंमत आता 84,999 रुपये आहे. आधी याची किंमत 89,999 रुपये होती. यातच S1 X 4kWh ची किंमत आता 99,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे, याआधी याची किंमत 1,09,999 रुपये होती. दरम्यान, S1 X ची डिलिव्हरी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. या सर्व ई-स्कूटर्सवर 8 वर्षांची वॉरंटी आहे.
ओला S1 ही सीरीज 3 बॅटरीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार त्यांची निवड करू शकता. असं असलं तरी आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक स्कूटरबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
अशा घटना घडल्या असल्या तरी या स्कूटरला बाजारात मोठी मागणी आहे. ही स्कूटर दिसायला खूपच स्टाईलिश आहे. तसेच याची रेंजही चांगली आहे. Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांच्या खिशालाही आता परवडणारी झाली आहे. जी आता Honda Activa पेक्षाही स्वस्त झाली आहे. Honda Activa ची एक्स शोरूम किंमत 76,234 रुपयांपासून सुरू होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.