प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने आपली दमदार बाईक Pulsar N250 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने याचीकिंमत 1.51 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक अपडेटेड फीचर्स दिले आहेत.
कंपनीने जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठे अपडेट यात दिले आहेत. यात 37mm USD Forks आहेत. आता ही बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात नवीन ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस मोड आणि डिजिटल कन्सोल फीचर ग्राहकांना मिळणार. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वात मोठा बदल समोरील बाजूस एन्ड्युरन्स-सोर्स्ड 37mm अपसाइड डाउन फॉर्क्सच्या स्वरूपात पाहायला मिळतो. यात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि तीन एबीएस मोड रेन, रोड आणि ऑफ-रोड यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. (Latest Marathi News)
नवीन पल्सर N250 मध्ये मागच्या बाजूला 140-सेक्शनचा रुंद टायर देण्यात आला आहे. तसेच रेड, लाल, व्हाईट आणि ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक सादर करण्यात आली आहे. रे
Bajaj Pulsar N250 मध्ये 249cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 24.1bhp पॉवर आणि 21.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. असिस्ट आणि स्लिपर क्लचसह मोटर 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. दरम्यान, या अपडेटड बाईकची किंमत 1,829 रुपयांनी वाढली आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेत Pulsar N250 आणि Suzuki Gixxer 250 शी स्पर्धा करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.