EPFO News: पीएफवरील व्याजदर वाढवणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

EPFO Interest Rate Update: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातील व्याजदरात बदल केला जाऊ शकतो. २ मार्च रोजी यासंदर्भात बैठक होणार आहे.
EPFO
EPFO Saam Tv
Published On
Summary

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

२ मार्च रोजी होणार सीबीटी बैठक

व्याजदराबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ईपीफओची मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक आहे. दरम्यान, या बैठकीत व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या वर्षी व्याजदरात कोणताही बदल न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

EPFO
EPFO खातेधारकांना झटका! PFवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता; पुढच्या महिन्यात होणार निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून ईपीएफओ व्याजदर हे स्थिर आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफवर ८.२५ टक्के व्याजदर मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर ठेवण्याची शक्यता आहे. याचा निर्णय २ मार्च रोजी होणाऱ्या सीबीटी बैठकीत याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या संकेतानुसार, या वर्षी पुन्हा व्याजदर तेच राहण्याची शक्यता आहे. ईपीएफओला कर्मचाऱ्यांना व्याजदर देण्यासाठी पुरेसा निधी नसेल. त्यामुळे नवीन गुंतवणूक गुंतवणूकीचा विचार करावा लागेल. अन्यथा पुढील वर्षापासून कमी परतावा मिळण्याची शक्यता आहे.

ईपीएफओ पैसे कुठे गुंतवते?

ईपीएफओ निधीपैकी ४५ ते ६५ टक्के रक्कम सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवते. २० ते ४५ टक्के निधी बॉन्ड्समध्ये गुंतवते. ५ ते १५ टक्के रक्कम ईक्विटीमध्ये गुंतवते. ५ टक्के रक्कम अल्पकालीन कर्जात गुंतवते. यातून येणाऱ्या परताव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना परतावा दिला जातो.

EPFO
EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

याआधी ईपीएफओची शेवटची बैठक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी होती. यावेळी पीएफमधून पैसे काढण्यासाठी अनेक सुधारणा करण्याची घोषणा करण्यात आली होती. ईपीएफओ व्यव्हार सुलभ करण्यासाठी नवीन पोर्टल सुरु केले जाणार आहे.

EPFO
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; UPI आणि एटीएममधून काढता येणार PF; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com