Nissan ची जबरदस्त SUV येत आहे, किंमत असेल 6 लाखांपेक्षा कमी? मिळणार जबरदस्त फीचर्स

Nissan Facelift Magnite: निसान भारतात आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात.
Nissan Facelift Magnite
Nissan Facelift MagniteSaam Tv

Nissan Facelift Magnite:

निसान भारतात आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. मॅग्नाइटला त्याच्या सेगमेंटमध्ये ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाली आहे आणि त्याची विक्रीही चांगली झाली आहे. आता हीच कार नवीन अवतारात कंपनी लॉन्च करणार आहे. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

सध्या मॅग्नाइटची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे. अपकमिंग मॉडेलमध्येही लांबीबाबत कोणताही बदल होणार नाही. एका रिपोर्ट्सनुसार, मॅग्नाइट टेस्टदरम्यान अनेक वेळा दिसली आहे. मॅग्नाइटमुळेच निसानच्या विक्रीत प्रचंड वाढ होताना दिसत आहे.

Nissan Facelift Magnite
New Electric Scooter: जबरदस्त रेंज अन् दिसायलाही छान; Ola इलेक्ट्रिक स्कूटर आता फक्त 69,999 रुपयांमध्ये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

फेसलिफ्टेड मॅग्नाइट टाटा नेक्सॉन, किया सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यूशी स्पर्धा करेल. या वर्षाच्या अखेरीस ही कार लॉन्च केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. नवीन मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणतेही नवीन बदल दिसणार नाहीत.

इंजिन आणि पॉवर

मॅग्नाइट फेसलिफ्टमध्ये 1.0 पेट्रोल इंजिन मिळेल. जे सुमारे 72hp पॉवर जनरेट करते. फीचर्सबद्दल सांगायचे तर, नवीन मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट मिळू शकतात. याशिवाय यात इन्फोटेनमेंट सिस्टिमसह 4 स्पीकर देण्यात येणार आहेत.

Nissan Facelift Magnite
Tata Tiago EV वर मिळत आहे 85,000 रुपयांची मोठी सूट, कमी किंमतीत कार खरेदी करण्याची संधी

सेफ्टीसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअरबॅग्ज आणि पॉवर स्टीयरिंग सारखी फीचर्स दिले जाऊ शकतात मानक असतील. नवीन मॅग्नाइटची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com