नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. येत्या वर्षात ऑनलाइन पेमेंट ते अगदी क्रेडिट कार्डपर्यंतचे नियम बदलणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र महागाईचा सामना करावा लागू शकतो. (Rule Change)
वाहनांच्या किंमती वाढणार
भारतातील कार कंपन्यानी उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. ह्युंदाईने २५,००० रुपयांपर्यंत तर महिंद्रा, मर्सिडीजने ३ टक्के किंमती वाढवल्या आहे. वाहनांचे पार्ट्स महाग झाल्याने या किंमती वाढल्या आहेत.
लक्झरी वस्तूंवर टिसीएस लागणार
आता तुम्हाला हँडबॅग, महागड्या वस्तू, १० लाखांपेक्षा जास्त किंमतीवर घड्याळांवर टिसीएस भरावा लागणार आहे. तुम्हाला १ टक्के टिसीएस भरावा लागणार आहे. (Rule Change From 2025)
UPI पेमेंटची लिमिट
येत्या वर्षात यूपीआय पेमेंटची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 123Pay सेवेद्वारे यूपीआयची लिमिट ५०,००० ते १०,००० रुपयांपर्यंतची करण्यात आली आहे.
सोने-चांदी महागणार
येत्या वर्षात सोने-चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव ८५ हजारांपर्यंत जातील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
रेशन कार्डचे नियम
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. बनावट रेशन कार्ड बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन वर्षात त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांची ई-केवायसी केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.