Bafna Jewellers : बाफना ज्वेलर्समध्ये काम करत पावणेतीन किलो सोने केले गहाळ; ऑनलाइन जुगारासाठी सेल्स मॅनेजरचे कृत्य

Sambhajinagar news : संदीप कुलथे हा बाफना ज्वेलर्समध्ये तीन महिन्यांपासून काम करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व्यवहाराबाबत संशय आला स्टॉकची माहिती घेतली असता अपहार केल्याचे दिसून आले
Bafna Jewellers
Bafna JewellersSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय लागण्याने यात पैसे हरला होता. यामुळे हे पैसे फेड करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या बाफना ज्वेलर्समधील सेल्स मॅनेजरने चक्क १ कोटी ९२ लाखांच्या पावणेतीन किलो सोन्यावर डल्ला मारला आहे. काम करत असताना त्याने हळूहळू सोने चोरी करणे सुरु केले. मात्र त्याच्या कामावर संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. जीन्सी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील बाफना ज्वेलर्स मध्ये कामाला असलेला संदीप प्रकाश कुलथे असे आरोपीचे नाव आहे. बाफना ज्वेलर्समध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर पदावर काम करीत होता. मूळ कारागीर असलेला संदीप कुलथे हा बाफना ज्वेलर्समध्ये तीन महिन्यांपासून काम करीत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व्यवहाराबाबत संशय आला होता. त्यावेळी स्टॉकची माहिती घेतली असता अपहार केल्याचे दिसून आले. 

Bafna Jewellers
Pune Crime: राजगुरूनगरमधून गायब झालेल्या २ बहिणींची हत्या, शेजारी राहणाऱ्या आचाऱ्यानेच केलं कृत्य; धक्कादायक कारण आलं समोर

जुगारामुळे झाला कर्जबाजारी 

गणेश उत्सवाच्या काळात तो पत्ते खेळायचा. मात्र जुगारामुले तो त्याच्यावर कर्ज झाले होते. नातेवाइकांकडून देखील त्याने कर्जाची रक्कम घेतली होती. दीड वर्षापूर्वी संदीपने वडगाव कोल्हाटी येथे ३० लाख रुपयांत स्वतःचे घर विकून ही सर्व रक्कम त्याने जुगारात उडवल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सोन्याच्या दुकानात काम करताना मोडीच्या व्यवहारात, वजनात हातचलाखी करुन सोने अलगद बाजूला काढून ठेवत चोरीला सुरूवात केली. नंतर २ महिन्यात त्याने ८७ दागिने चोरले होते.

Bafna Jewellers
Online Fraud : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये २६ लाखांची फसवणूक; भंडारा पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

दोन महिन्यात चोरले पावणेतीन किलो सोने 

दरम्यान त्याने २४ ऑक्टोबरपासून २४ डिसेंबरपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याने सोने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. २४ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर या दोन महिन्यांत त्याने सुवर्णपेढीतून थोडे थोडे सोने गहाळ केले होते. त्यात २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याची चेन, ब्रासलेट, कडे व इतर सोन्याच्या वस्तू असा सुमारे १ कोटी ९२ लाख ९० हजार २९० रुपयांचा ऐवज होता. संदीप कुलथे हा वयाच्या १६ व्या वर्षापासून जुगार खेळत होता. यातूनच त्याने सोने चोरीचे कृत्य केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com