डोंबिवली एमआयडीसीत गॅस पाइपलाईन फुटली; परिसरात भीतीचे वातावरण

Gas Pipeline Burst In Dombivli MIDC Milap Nagar: डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर परिसरात जेसीबीच्या धक्क्याने गॅस पाइपलाईन फुटल्याने गॅस पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Gas pipeline repair work underway after leakage incident in Dombivli MIDC area.
Gas pipeline repair work underway after leakage incident in Dombivli MIDC area.Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली: येथील एमआयडीसी परिसरातील मिलापनगर येथे आज गुरुवारी दुपारी मोठी घटना घडली. प्लॉट क्रमांक RL-25 जवळ एमआयडीसीकडून सुरू असलेल्या गटाराच्या कामादरम्यान जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची पाइपलाईन दुपारच्या सुमारास फुटली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वप्रथम सुरक्षेच्या दृष्टीने गॅस पुरवठा बंद करण्यात आला. तसेच एमआयडीसीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

Gas pipeline repair work underway after leakage incident in Dombivli MIDC area.
Mumbai Crime News: कर्जाचे आश्वासन देऊन व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

एमआयडीसी ठेकेदाराकडून काम करताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणाच्या घटना यापूर्वीही घडल्याचे समोर आले आहे. 31 जानेवारी रोजी गटाराचे काम सुरू असताना एका मोठ्या झाडाच्या मुळांना धक्का लागल्याने ते झाड महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर आणि उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांवर कोसळले होते. त्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

Gas pipeline repair work underway after leakage incident in Dombivli MIDC area.
Kalyan Shivsena VS Bjp News : कल्याण पूर्वेत Shiv Sena Shinde गट VS Bjp वाद शिगेला.. प्रकरण काय?

सद्यस्थितीत महानगर गॅसकडून फुटलेल्या पाइपलाईनची दुरुस्ती सुरू करण्यात आली असून परिसरातील गॅस पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होणार आणि गॅस पुरवठा केव्हा पूर्ववत होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मिलापनगर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com