Railway New Rule: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने प्रवासाच्या नियमात केला मोठा बदल; वाचा सविस्तर...

Railway New Rule: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या बोर्डिंग स्टेशनसंदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी फायदा होणार आहे.
Railway New Rule
Railway New RuleSaam Tv
Published On

रेल्वेने प्रवास करणाऱ्यासांठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या बोर्डिंग स्टेशनसंदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी फायदा होणार आहे. नेमका काय हा निर्णय आहे? कोणासाठी लागू होणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने नुकताच एक नवीन नियम सुरू केला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. प्रवास सुरू करण्याआधी तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलायचे असल्यास तुम्हाला आता बदलता येणार आहे. अचानक प्रवासात बदल झालेल्या प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. प्रवाशांच्या बोर्डिंग स्टेशनसंदर्भात नवा नियम काढला आहे.

Railway New Rule
Pan Card Rule: महत्त्वाची बातमी! पॅन कार्डच्या नियमांत मोठा बदल; १ एप्रिलपासून होणार लागू

१ एप्रिल म्हणजे कालपासून हा नवा नियम लागू झाला आहे. या नियमानुसार आता प्रवाशांना त्यांचे बोर्डिंग स्टेशन प्रवास सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधीही बदलता येणार आहे. पूर्वी तुम्हाला जर बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल तर ट्रेन सुरू होण्याच्या २४ तासांच्या अगोदर हा बदल करावा लागायचा. ट्रेन सुरू व्हायला २४ तासांपेक्षा कमी वेळ असेल तर बोर्डिंग स्टेशन बदलता येत नव्हते मात्र आता नव्या नियमांनुसार अवघ्या अर्धातासांमध्ये तुम्ही बोर्डिंग स्टेशन बदलू शकणार आहात.

कसा कराल बदल?

IRCTC च्या वेबसाईटवर, अॅपवर किंवा रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरच्या माध्यमातून तुम्ही बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. बदल केल्यानंतर तुम्हाला नवीन बोर्डिंग पॉईंट सेकंड रिझर्वेशन चार्टमध्ये अपडेट झालेले दिसेल

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com