Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: EPFO ते LPG गॅसच्या किंमती; आजपासून या नियमांमध्ये मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Rule Change From 1st March 2025: आजपासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. यूपीआय ते ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

मार्च महिना सुरु झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. एलपीजी गॅस ते ईपीएफओच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

LPG च्या किंमतीत वाढ

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदल होतात. मार्च महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमतीत ६ रुपयांनी वाढ झाली आहे. १९ किलोच्या किंमतीत कपात झाली होती.

जेट फ्लूएलच्या किंमतीत बदल

प्रत्येक महिन्यात विमानाच्या इंधनाच्या किंमतीत बदल झाले आहेत. यामुळे हवाई प्रवास महागणार आहे.

EPFO चे दर

EPFO ने काल बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने पीएफचे व्याजदर ८.२५ टक्के झाले आहे.याबाबत ईपीएफओने सीबीटीकडे प्रस्ताव दिला होता.

UPI मध्ये विमा प्रिमियम पेमेंट

आता यूपीआयद्वारे विमा प्रिमियम पेमेंट करणे सोपे होणार आहे. आयआरडीएआयने विमा एएसबीए नावाची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये तुम्हाला यूपीआय प्रिमियम पेमेंट करता येईल.

म्युच्युअल फंडमध्ये नॉमिनी

म्युच्युअल फंड आणि डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनेशनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. डिमॅट आणि म्युच्युअल फंज फोलियोमध्ये १० लोकांना नॉमिनी बनवू शकतो.

UAN नंबर अॅक्टिव्हेशन

EPFO ने यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यांनी यूएएन नंबर आणि आधार लिंक करण्यासाठी मुदत वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT