Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change 1st January: थेट तुमच्यावर परिणाम, नव्या वर्षांपासून १० नियमात मोठा बदल, वाचा

Rule Change From 1st January 2026: आज नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. आधार-पॅन लिंक, टॅक्स ते पीएम किसानच्या नियमांत बदल झाले आहेत.

Siddhi Hande

आजपासून हे नियम बदलले

आधार कार्ड, टॅक्सच्या नियमात बदल

थेट तुमच्या आयुष्यावर होणार परिणाम

नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्याची सुरुवात आजपासूनच झाली आहे. आज १ जानेवारी २०२६ पासूनच अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. पगार, बँकिंग, टॅक्स आणि सरकारी नियमात बदल झाले आहेत.

आजपासून हे नियम बदलले (Rule Change From Today 1st January 2026)

1.आधार पॅन कार्ड लिंकची डेडलाइन (Aadhaar Pan Card Link Deadline)

आधार आणि पॅन कार्ड लिंक करायची डेडलाइन संपली आहे. आता तुम्हाला यापुढे आधार पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. यामुळे ज्यांनी अजून हे काम केले नाही त्यांचे पॅन कार्ड बंद होणार आहे.

2. नवीन आयटीआर फॉर्म (New ITR Form)

२०२६ पासून नवीन इन्कम टॅक्स फॉर्म लागू होणार आहेत. याची प्रोसेस आजपासून सुरु झाली आहे. यामध्ये तुम्हाला बँक ट्रान्झॅक्शन आणि खर्चाची माहिती द्यावी लागणार आहे.

3. नवीन टॅक्स कायदा

नवीन वर्षात नवीन टॅक्स कायदा लागू केला जाणार आहे. सरकार जुना इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ काढून नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे.१ एप्रिलपासून नवीन अॅक्ट लागू होणार आहे.

4. आठवा वेतन आयोग

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. या नवीन वेतन आयोगाचा ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

5. पीएम किसानच्या नियमात बदल

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर फार्मर आयडी नसेल तर योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता काही राज्यातच हा नियम आहे. भविष्यात संपूर्ण देशात हा नियम लागू केला जाईल.

6. क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्याला अपडेट होणा

आजा क्रेडिट कार्डच्याही नियमात बदल झाले आहे. क्रेडिट स्कोअर दर महिन्याला अपडेट होणार आहे.

7. बँक आणि एफडीच्या दरात बदल

नवीन वर्षात बँकेच्या व्याजदरात आणि एफडीमध्ये बदल होणार आहे. यातील व्याजदर बदलणार आहेत. यामुळे ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

8. एलपीजी गॅस

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. आजदेखील हे बदल झाले आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती १११ रुपयांनी वाढल्या आहेत.

9. व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसाठी नियम

आता व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम अॅपसाठी नियम लागू केले आहे. आता या अॅपसाठी फोन नंबर अनिवार्य केला आहे. फोन नंबर ९० दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह असणे अनिवार्य आहे.

10. पेट्रोल, डिझेलचे दर

आजपासून एव्हिशन फ्यूएलचे दरदेखील बदलले आहेत. हे दर कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. जर कच्च्या तेलाचे दर घसरले तर इंधनाचे दरदेखील बदलतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Shocking: नवीन वर्षाचे स्वागत करताना बारमध्ये भीषण स्फोट, किंकाळ्या अन् आगीच्या ज्वाळा; अनेकांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Blood Pressure: कोणत्या वेळी BP अचानक वाढतो? डॉक्टरांनीच दिली माहिती, वेळीच व्हा सावध

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद, समोर आली अपडेट

Hair Care : केसांना मुलतानी माती लावण्याचे चमत्कारिक फायदे , जाणून घ्या

SCROLL FOR NEXT