Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती
१ जानेवारी २०२६ पासून अनेक नवीन नियम लागू होणार
एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर होणार
घरगुती व व्यावसायिक दोन्ही सिलिंडरच्या दरात बदल शक्य
आज २०२५ चा शेवटचा दिवस असून उद्या गुरुवारी नवीन वर्षाची (२०२६) सुरुवात होतेय. तर १ जानेवारी रोजी देशात अनेक मोठ्या बदलांची सुरुवात होणार आहे. या बदलांचा परिणाम प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होत असतो. हे बदल तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटमध्ये बदल घडवून आणू शकतात.
दरम्यान देशातील सरकारी मालकीच्या तेल आणि गॅस कंपन्या उद्या म्हणजे १ जानेवारी २०२६ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. यासह केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपासून पॅन कार्ड धारकांपर्यंत सर्वांसाठी नियम बदलले जात आहेत.
आधार कार्ड आणि पॅन लिंक करण्याची शेवटची संधी ३१ डिसेंबरपर्यंत होती. १ जानेवारीपासून आता तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पॅन निष्क्रिय झाल्याने विविध आर्थिक अडचणी येऊ शकतात. युझर्स आयटीआर परतफेड, पावत्या आणि बँकिंग फायदे मिळवू शकणार नाहीत. तसेच, पॅन निष्क्रिय झाल्यामुळे, अनेक सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागेल.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल विपणन कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती सुधारित करतात आणि १ जानेवारीपासून त्याच्या किंमती देखील बदलू शकतात. अलिकडच्या काळात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झाले असले तरी, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाहीये.
अशा परिस्थितीत, तेल कंपन्या १ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा नवीन एलपीजी किमती जारी करू शकतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर होऊ शकतो. डिसेंबरच्या सुरुवातीला एलपीजीच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. दरम्यान एलपीजीच्या किमतीतील बदलासोबतच, तेल विपणन कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी हवाई टर्बाइन इंधनाची सुधारित किंमत (एटीएफ किंमत) देखील जाहीर केली जाते, ज्याचा थेट परिणाम हवाई प्रवाशांच्या भाड्यावर होतो. १ जानेवारीपासून जेट फ्युएलसोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्येही बदल दिसून येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

