Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Amravati Accident News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी–वरुड रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

Saam Tv
Published On
Summary
  • अमरावतीतील मोर्शी–वरुड रोडवर भीषण अपघात

  • भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक

  • दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू

  • पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू

अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मोर्शी ते वरुड रोडवर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव बद्रीनाथ रूपसा मसराम असे असून त्याच्या पत्नीचे नाव ज्योती बद्रीनाथ मसराम असे आहे. अपघाताच्या दिवशी बद्रीनाथ आणि त्यांची बायको ज्योती हे दोघेही शेंदुरजना बाजार येथून काम आटोपून दुचाकीने गावी जापका येथे मोर्शी/हिवरखेड मार्गे जात होते.

Amravati Accident News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी–वरुड रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

याचं दरम्यान समोरून वरुड येथून मोर्शीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एलपी ट्रकने या दांपत्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत मोटर सायकल चालक बद्रीनाथ मसराम यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली. रस्त्यावरील अपघात बघून स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले.

Amravati Accident News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी–वरुड रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

ज्योती यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र बद्रीनाथ मसराम यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com