Realme Narzo N65 5G Saam Tv
बिझनेस

5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! Realme Narzo N65 5G लॉन्च, किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी

Realme Narzo N65 5G: Realme ने भारतात आपलं नवीन दमदार स्मार्टफोन Realme Narzo N65 5G लॉन्च केला आहे. याची किंमत कंपनीने 12,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Realme ने सोमवारी भारतात आपला बजेट फ्रेंडली Narzo N65 5G स्मार्टफोन लॉन्च केला. हा हँडसेट एंट्री-लेव्हल 5G स्मार्टफोन रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimension 6300 चिपसेट आणि 6GB पर्यंत RAM देण्यात आता आहे. याव्यतिरिक्त यात 5,000mAh बॅटरी आणि 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जर तुम्ही 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रेंजमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी याची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या...

किती आहे किंमत?

Realme Narzo N65 5G च्या बेस्ट बेस मॉडेलची (4GB + 128GB) किंमत कंपनीने 11,499 रुपये ठेवली आहे. तर, 6GB + 128GB मॉडेलची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात अली आहे.

कंपनीने हा फोन एम्बर गोल्ड आणि डीप ग्रीन कलरमध्ये सादर केला आहे. फोनवर कूपन डिस्काउंटद्वारे ग्राहक 1,000 रुपयांची सूट मिळवू शकतात. या फोनची विक्री 31 मे पासून Amazon आणि Realme.com वर सुरू होईल. तुम्ही फोनसह Realme Wireless 2 Neo ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरून 899 रुपयांना खरेदी करू शकता.

Realme चा नवीन फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 625nits पीक ब्राइटनेससह 6.67-इंच HD+ स्क्रीनसह येतो. या फोनचे वजन 190 ग्रॅम आहे. डिव्हाइस 6nm MediaTek Dimensity 6300 चिपसेटसह सुसज्ज आहे. हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालतो. यात 15W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि चार्जिंगसाठी यूएसबी-सी पोर्ट आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: काँग्रेस वर्किंग कमिटीची राज्यातील पराभवावर बैठक होणार

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

Free Visa for Indian: भारतीयांना 'या' देशात मिळणार व्हिसा फ्रि एन्ट्री

SCROLL FOR NEXT