2000 Note Exchange
2000 Note Exchange Saam Tv
बिझनेस

2000 Note Exchange : १ एप्रिलला २००० रुपयांची नोट बदलता येणार नाही, RBI ने दिली महत्त्वाची माहिती

कोमल दामुद्रे

2000 Note Exchange Update :

मागच्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अनेकांनी २००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा केल्या जातील असा आदेशही देण्यात आला.

नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी आरबीआयची मुदत होती. परंतु, दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही पूर्णपणे प्रणालीत आलेल्या नाहीत. आरबीआय (RBI) सध्या दोन हजारांची नोट जमा करण्याची संधी देत आहे. तसेच पोस्टाने देखील २००० रुपयांची (Money) नोट जमा करता येते.

सध्या आरबीआयने २००० रुपयांच्या नोटांबाबत प्रसिद्धीपत्रक जमा केले आहे. या परिपत्रकानुसार १ एप्रिलपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात २ हजार रुपयांच्या नोटा जमा होणार नाही.

1. का बदलता येणार नाही २००० ची नोट

सामान्य लोकांना १ एप्रिलला २ हजारांची नोट बदलता येणार नाही. याचे कारण असे की, वार्षिक अकाउंटिंगशी संबंधित कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बँक (Bank) कामामुळे बंद असल्यामुळे पैसे जमा करता येणार नाही.

2. २००० च्या नोटा कधीपासून बदलणार

तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही २ एप्रिलपासून त्या बदलू शकता. ही नोट बदलण्याची सेवा २ एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे.

3. १ एप्रिलला बँक का बंद?

आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मागील वर्षातील काही गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. त्यासाठी १ एप्रिलला बँका सर्वसामान्यांसाठी बंद राहातील. तसेच सध्या लाँग वीकेंड असल्यामुळे पुढील ४ दिवस बँका बंद राहातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Road Accident: मुंडन विधी करुन घराकडे जाताना काळाची झडप, कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ ठार

Konkan: आंब्याच्या लाकडी पेट्या होणार इतिहासजमा, प्लॅस्टिकच्या कॅरेटला बागायतदारांची पसंती; जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: परळीत धनंजय मुंडेंची भर पावसात सभा; बहिणीच्या प्रचारासाठी भाऊ भिजला; बीडमधील समीकरणं बदलणार?

Sunflower Oil: त्वचेच्या समस्यांवर लाभदायी सूर्यफूलाचे तेल , फायदे वाचा

Shani Dev : दैनंदिन जीवनात चुकूनही 'या' चूका करू नका; अन्यथा शनिदेवाचा कोप होईल

SCROLL FOR NEXT