रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. फ्रॉड कॉलला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निर्देश जारी केले आहे. सध्या सर्वकाही मोबाईलवर एका क्लिकर कळतं. सध्या मोबाईलद्वारे फ्रॉड होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे अनेकदा सामान्य नागरिकांचे नुकसानदेखील होते.
अनेकांचे या फ्रॉड कॉलमुळे नुकसान होते.त्यामुळे अनेकदा तुमची सर्व माहिती समोरच्या फ्रॉड व्यक्तीला कळते. त्यामुळे तो तुमच्या माहितीचा गैरवापरदेखील करु शकतो. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे.याबाबत आरबीआयने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फक्त बँक आणि प्रचारासंबंधित कॉल उचलायला सांगितले आहे. बँकेकडून येणारे कॉलच्या नंबरची सुरुवात १६०० या नंबरपासून सुरु होते. त्यामुळे फक्त तेच नंबर तुम्ही उचला. त्यावरच तुम्हाला अधिकृत माहिती मिळू शकते. इतर नंबर तुम्ही उचलले तर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो.
याचसोबत जर कोणते मार्केटिंगबाबत फोन कॉल असतील तर त्याची सुरुवात १४० या नंबरने होईल. १४० या नंबरवरुन तुम्हाला मेसेजदेखील येऊ शकतो. हे मार्केटिंगसंबंधित असू शकतात. त्यामुळे फक्त या दोन नंबरवरुन आलेले फोन तुम्ही उचला.
आजकाल सायबर फ्रॉड होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. सायबर फ्रॉडमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू घेतले जातात. त्यामुळे नेहमी सावध राहूनच कोणतेही फोन कॉल उचला. तसेच कोणालाही स्वतः ची माहिती देऊ नका. त्यामुळे तुमचे नुकसान होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.