ऑपरेशन सिंदूरनं भारताने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपली लष्करी बळ दाखवून दिलं. त्यात आता पश्चिम सीमेवरील वाळवंटात भारताची लष्करी शक्ती वाढणार आहे. भारतीय लष्कराला अमेरिकेकडून अपाचे AH-64E लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. हा करार तब्बल 600 दशलक्ष डॉलर्सचा आहे.
अपाचे' शत्रूचा कर्दनकाळ
अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून 'अपाचे हेलिकॉप्टर' विकसित
जगातील सर्वात धोकादायक हेलिकॉप्टर
ताशी वेग 280 किमी ते 480 किमी
हेलिकॉप्टरमध्ये नाईट व्हिजन आणि थर्मल सेन्सर्स
स्टिंगर, हेलफायर, स्पाइक NLOS सारखी घातक क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता
अपाचेची ऑपरेशनल रेंज 365 किमी ते 500 किमी
मुळात भारतीय भारतीय हवाई दलाकडे आधीच 22 अपाचे हेलिकॉप्टर आहेत. त्यात आता पुन्हा 6 अपाचे हेलिकॉप्टरची स्वतंत्रपणे खरेदी करण्यात येतेय. त्यामुळे अपाचे हेलिकॉप्टरमुळे भारतीय लष्कराची शत्रूवरील हल्ल्याची तीव्रता अनेक पटीनं वाढणार आहे. त्यामुळे अपाचे हेलिकॉप्टर पाकिस्तानला थेट इशारा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.