Crop Insurance Scheme: १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होणार? बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस

Maharashtra Government: शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा योजना सुरू केली खरी मात्र यात मोठा गैरव्यवहार समोर आल्यामुळे ही योजनाच बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीनं केली आहे. आता या बाबत सरकार काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Crop Insurance Scheme: १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होणार? बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस
Crop Insurance SchemeSaam Tv
Published On

विनोद पाटील, साम टीव्ही

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आता १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तांच्या समितीनं सरकारला योजना बंद करण्याची शिफारस केलीय. नेमकी ही शिफारस का केली? कोण आहे याला जबाबदार? हे आपण जाणून घेणार आहोत...

शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा योजना सुरू केली खरी मात्र यात मोठा गैरव्यवहार समोर आल्यामुळे ही योजनाच बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीनं केली आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नापीक जमिनी, मंदिरं, पेट्रोल पंप, हॉटेल्सच्या जागांवरही पीक काढल्याच्या धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत.

या योजनेत एकूण १६ कोटी १९ लाख ८ हजार ८५० अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र त्यातील तब्बल ४ लाख अर्ज बोगस असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. आणि बोगस अर्जांमुळे गैरव्यवहाराची रक्कम तब्बल ३५० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Crop Insurance Scheme: १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होणार? बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस
Maharashtra politics : शिवसेनेत धुसफूस; माजी मंत्री आक्रमक; एकनाथ शिंदेंकडे करणार पालकमंत्र्यांची तक्रार

तर हा घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. मात्र हे सर्व अर्ज बाद केल्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकोटेंचं म्हणणं आहे. समितीनं शिफारस केली असली तरी त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं कोकाटेंनी सांगितलं आहे.

Crop Insurance Scheme: १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होणार? बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस
Maharashtra : महाराष्ट्रातील मिनी थायलंड पाहिलत का? जणू निसर्गाचा अद्भूत चमत्कार

राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विम्याची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र सर्वाधिक बोग विम्याची प्रकरणं बीड जिल्ह्यात समोर आली आहेत. सर्वाधिक गैरव्यवहार कोणत्या जिल्ह्यांमध्ये झाली आहेत ते पाहूयात...

पीकविम्यासाठी सर्वाधिक बोगस अर्ज -

बीड - १ लाख ९ हजार २६४

सातारा - ५३ हजार १३७

जळगाव - ३३ हजार ७८६

परभणी - २१ हजार ३१५

सांगली - १७ हजार २१७

Crop Insurance Scheme: १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होणार? बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस
Maharashtra politics : शिवसेनेत धुसफूस; माजी मंत्री आक्रमक; एकनाथ शिंदेंकडे करणार पालकमंत्र्यांची तक्रार

एक रुपयात पीक विमा काढता येत असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांऐवजी दुसरेच त्याचा लाभ घेत असल्याचं उघड झालंय. तर अर्ज भरून देणाऱ्या सीएससी चालकांना प्रत्येक अर्जासाठी ४० रूपये तर मिळतात. त्यामुळे हे केंद्र चालकही कमिशनसाठी बोगस अर्ज भरत असल्याचंही पुढं आलंय. त्यामुळे सरकारनं थेट योजना बंद करून चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यापेक्षा योजना पारदर्शक कशी राबवता येईल यावर भर द्यायला हवा.

Crop Insurance Scheme: १ रुपयाचा पीक विमा योजना बंद होणार? बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस
Maharashtra Politics : महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद; रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com