५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Baba Venga Prophecy : नव्या बाबा वेंगानं केलेल्या भविष्यवाणीला अवघा एक दिवस बाकी आहे. त्यामुळे जगात खळबळ उडालीय. मात्र ही विनाशाची भविष्यवाणी नेमकी काय आहे, लोकांनी कसा धसका घेतलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Baba Venga Prophecy
Baba Venga ProphecySaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टिव्ही

जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे... भारत-पाकिस्तान, इराण-इस्त्राईल, रशिया-युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळं जगावर तिसऱ्या महाय़ुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरु आहे. अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडाली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे. .हे भाकित वर्तवलंय नवीन बाबा वेंगा म्हणून ओळख असलेल्या जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकीने.... आता 5 जुलैला एकच दिवस बाकी असल्याने जगभरात खळबळ उडालीय..... मात्र या नव्या बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या कोणत्या भविष्यवाणी आहेत? पाहूयात...

1995 मध्ये जपानच्या कोबे शहरातील विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी

राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरीच्या मृत्यूची घोषणा

2011 मधील तोहोकू भूकंप आणि त्सुनामीमुळे 22 हजार लोकांचा मृत्यू

2020 मध्ये जगभरात जीवघेण्या विषाणूच्या महामारीची भविष्यवाणी

खरंतर 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहेत. मात्र तात्सुकीने 1999 मध्ये तिच्या मंगा द फ्यूचर आय सॉ यामध्ये 5 जुलैला जपानमध्ये भीषण आपत्ती येण्याची भविष्यवाणी केलीय.. आता 5 जुलैला एकच दिवस शिल्लक असल्याने हाँगकाँग ते जपान विमान तिकीट बुकिंगमध्ये 83 टक्के घट झालीय... तर अनेक जण देश सोडण्याच्या तयारीत आहेत....मात्र जपान सरकारने नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय....तर दुसरीकडे भारतातही ज्योतिषांनी ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय...

जुलै महिना, जगाला टेन्शन

- ग्रहांच्या स्थितीमुळे सावधानतेचा इशारा

- मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती

- जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता

- भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीची शक्यता

- 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील

- शनि-मंगळाच्या युतीमुळे अपघाताचा इशारा

- अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला

एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे ऐन पावसाळ्यात जगभरात वातावरण तापलंय... तर भाकितातून व्यक्त केलेलं संकट अवघ्या 1 दिवसावर आल्याची चर्चाय... मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com