Ration Card Saam Tv
बिझनेस

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ration Card KYC Online Process: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केवायसी करु शकणार आहात.

Siddhi Hande

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

आता ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करता येणार केवायसी

केवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

देशातील कोट्यवधी नागरिकांकडे रेशन कार्ड आहे. रेशन कार्डद्वारे स्वस्त आणि मोफत अन्नधान्य दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाखो नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. रेशन कार्ड हे एक ओळखपत्रदेखील आहे. दरम्यान, रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.रेशन कार्डधारकांना आता केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत अन्नधान्य मिळणार नाही.

सरकारच्या नवीन नियमांनुसार, तुम्हाला दर पाच वर्षांनी ई केवायसी करावे लागणार आहे. अनेकांनी २०१३ मध्ये शेवटचे केवायसी केले होते.त्यानंतर कित्येक वर्ष रेशन कार्ड केवायसी केले नाही. ज्यांनी केवायसी केले नाही ते आता ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

घरबसल्या केवायसी कसे करायचे? (Ration Card KYC Online Process)

तुम्हाला मोबाईलवर मेरा केवायसी आणि आधार फेस आयडी अॅप डाउनलोड करायचं आहे.

यानंतर तुम्ही जिथे राहता तेथील माहिती भरा.

यानंतर आधार कार्ड नंबर टाका. कॅप्चा कोड टाकून ओटीपी टाकून वेरिफाय करा.

यानंतर फेस ई केवायसी ऑप्शन निवडा. त्यात तुमचा कॅमेरा ओपन होईल. त्यानंतर तुमचा फोटो क्लिक होईल.

यानंतर फोटो सबमिट करा. तुमचे केवायसी पूर्ण होईल.

केवायसी पूर्ण झाले की नाही कसं चेक करायचं?

तुम्हाला मेरा केवायसी हे अॅप डाउनलोड करायचे आहे.

यानंतर ठिकाणाची माहिती द्यायची आहे.

यानंतर आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकायचा आहे.

यानंतर जर तुम्हाला Y दिसत असेल तुमचे केवायसी झाले आहे. जर N दिसत असेल म्हणजे केवायसी पूर्ण झालेले नाही.

ऑफलाइन केवायसी कसे करावे? (Ration Card KYC Offline Process)

तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊनदेखील केवायसी करता येणार आहे. तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जायचे आहे. तिथे रेशन दुकानदार तुमचे केवायसी पूर्ण करेल. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

क्षणात होत्याचं नव्हतं! ५७ प्रवाशांनी भरलेली धावती बस आगीच्या भक्ष्यस्थानी; १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Arthritis joint care tips: संधिवाताबद्दल जाणून घ्या 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी; सांध्यांची काळजी घेणं गरजेचं

ZP Teachers Salary: जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची "दिवाळी होणार गोड"; सरकारचा मोठा निर्णय

APJ Abdul Kalam: अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

SCROLL FOR NEXT