Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Bogus Ration Card Distribution: अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यात बोगस रेशन कार्डच्या नावाखाली एका एजंटने तब्बल ३ लाख रुपये उकळले आहेत.
Ration Card
Ration Card
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोल्यात एका दिवसात 100 पेक्षा अधिक बोगस शिधापत्रिका (रेशन कार्ड) नागरिकांना वाटप केल्याचा प्रकार समोर आलाय.. अकोल्यातल्या मोठी उमरी परिसरात चक्क एका एजेंटने तहसीलमध्ये बसून तब्बल 100 च्या जवळपास बोगस शिधापत्रिका तयार करुन वाटप केल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय..

Ration Card
Akola : 'एक जिल्हा, एक उत्पादन'मध्ये महाराष्ट्राला सुवर्ण; कापूस प्रक्रिया उद्योगात अकोल्याला राष्ट्रीय पारितोषिक

या प्रकरणात तहसील विभागाने चौकशी समिती गठीत केलीये.. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू सुरु झाली असून सद्यस्थितीत वाटप करण्यात आलेले 2 रेशन कार्ड ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन्ही बोगस रेशन कार्ड उमरी परिसरातल्या गुडधी भागातील नागरिकांना देण्यात आलं होतं.

दरम्यान, अकोल्यातल्या गजानन सुरवाडे नामक या एजंटने हे बोगस राशन कार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे 3 हजार रुपयात राशन कार्ड बनवून देत एका दिवसातच वाटप केले आहे. वाटप झालेल्या नागरिकांनी रेशन कार्डची नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागात गेले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या रेशन कार्ड क्रमांकाची आधीच रेशन कार्डची नोंदनी असल्याने हे बिंग फुटले आहे..

Ration Card
Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

विशेष म्हणजे या रेशन कार्ड वरील 'निरीक्षण अधिकाऱ्याची सही आणि पुरवठा विभागाचा शिक्का देखील बनावट आहे.. या प्रकारामुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे बनावट रेशन कार्ड असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, आमच्या विभागातून हे वाटप करण्यात आलेलं नाहीये. सद्यस्थितीत आमच्याकडे या संदर्भात दोन तक्रारी आले आहेत. याची संपूर्ण चौकशी केल्या जात आहे. अशी माहिती तहसील विभागातील अकोला ग्रामीण पुरवठा विभाग अधिकारी विश्वजित लिंगायत यांनी दिली.

Ration Card
eKYC Ration Card: मोबाईलवर घरबसल्या करा रेशन कार्डची eKYC; पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस, कधी आहे अखेरची मुदत

मोठी उमरी भागातील लक्ष्मीप्रकाश चाटसे यांच्याकडून 3 हजार रुपये घेत एका दिवसातच त्यांना हे रेशन कार्ड देण्यात आलं होत, त्याशिवाय उमरी भागातील अनिता संतोष इंगळे यांच्याकडून देखील पैसे आकारात रेशन कार्ड देण्यात आलं होतं. दोन्ही रेशन पुस्तक क्रमांकाची अकोल्यातल्या शिवर परिसरातील नागरिकांच्या नावाने नोंदणी असल्याच समोर आलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचे बिंग फुटल आहे. त्यांनी रीतसर तहसील विभागात तक्रार केली असून त्यांचा जवाब नोंदवण्यात आला आहे.

Ration Card
Crop Insurance Scheme: फळपिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; राज्य सरकारचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com