Ambarnath News : धक्कादायक.. 'आनंदाच्या शिध्या'ची काळ्या बाजारात विक्री; रेशन दुकान कर्मचारीसह एकजण ताब्यात, रेशन दुकानही केलं सील VIDEO

Ambarnath News : राज्य शासनाकडून रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जात असतो. मात्र अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील ४६ फ ००१ या रेशन दुकानात सरकारकडून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं
Ambarnath News
Ambarnath NewsSaam tv
Published On

अंबरनाथ : राज्य सरकारकडून सण उत्सवात आनंदाचा शिधा दिला जात असतो. मात्र या आनंदाच्या शिध्याची अंबरनाथमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला असून शिधावाटप अधिकाऱ्यांकडून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राज्य शासनाकडून रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जात असतो. मात्र अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील ४६ फ ००१ या रेशन दुकानात सरकारकडून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं. यापैकी सोयाबीन खाद्य तेलाच्या २७० लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खाजगी टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिल्यामुळे गोसावी यांनी शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना पाचारण केलं. 

Ambarnath News
Shahada Crime : दुकानासमोरून जात असल्याच्या शुल्लक कारणातून खून; शहादा तालुक्यातील घटना, दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल

रेशन दुकानालाही लावले सील 

शिधा वाटप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता हे सरकारतर्फे देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यामधील तेल असल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करत टेम्पो चालक आणि रेशन दुकानात काम करणारा कर्मचारी यांना ताब्यात घेतलं आहे. हे तेल नेमकं कुणाच्या सांगण्यावरून आणि कुठे विक्रीसाठी नेलं जात होतं? याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. या सगळ्या नंतर शिधावाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही सील ठोकलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com