सागर निकवाडे
नंदुरबार : गावात असलेल्या दुकानासमोरून नागरिक ये जा करत होते. त्याचा राग आल्याने तू आमच्या दुकानात समोरून का जातो दुसरा रस्ता नाही का? असे सांगत दोघा भावांनी एकाचा बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शहादा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा (Shahada) तालुक्यातील खेडदिगर या गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. गावातील हनुमान मंदिराजवळ यशवंत मोरे यांचे दुकान आहे. त्या दुकानासमोरून दयाराम साठे ये जा करीत असतं. याचा राग येऊन ९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास यशवंत मोरे याने दयाराम साठे यांना अडवत आमच्या दुकानात समोरून का जातो? तुला दुसरा रस्ता नाही का? असे म्हणत शिवीगाळ केली. यादरम्यान यशवंत मोरे याचा भाऊ अनिल मोरे याने दयाराम साठे यांना लाकडी दांड्याने डोक्यावर तसेच पाठीवर मारहाण केली. (Crime News) तसेच यशवंतने देखील लाथा बुक्क्यांनी पोटावर मारहाण केली.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
दोघं भावांनी केलेल्या मारहाणीत दयाराम शिवलाल साठे (वय ५२) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरती जितेंद्र रामोळे याच्या फिर्यादीवरून अनिल हिरामण मोरे व यशवंत हिरामण मोरे याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.