Railway Rule Saam Tv
बिझनेस

Railway Rule: रेल्वेचा मोठा निर्णय! ज्येष्ठ नागरिकांना जबरदस्त फायदा; प्रवासाचं टेन्शन मिटलं!

Railway Rule Of Lower Berth: रेल्वेने प्रवास करण्याऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये लोवर बर्थ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Siddhi Hande

रोज लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करताना अनेक अडचणी येतात. यात सर्वात जास्त अडचणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना येतात. सामान्यतः रेल्वेत तीन बर्थ असतात. त्यात अपर बर्थ म्हणजेच सर्वात बरच्या सीटवर बसण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच आता रेल्वेने नवीन नियम लागू केला आहेय

ज्येष्ठ नागरिकांचा रेल्वेमधील प्रवास सुखकर व्हावा यासाठी लोवर बर्थ म्हणजेच सर्वात शेवटची खालच्या बाजूची सीट ही आरक्षित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रेनमधील लोवर बर्थ आरक्षित करण्यात आली आहे. IRCTC ने याबाबत काम सुरु केले आहे. IRCTC च्या वेबसाइटवर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लोवर बर्थ सीट बुक करतात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे?

एका प्रवाशाने रेल्वेला टॅग करत ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली होती. त्यालाच रिप्लाय देत प्रवाशाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट कसं बुक करायचं ते सांगितलं आहे.

  • सर्वप्रथम तुम्ही आयसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करा. त्यासाठी सामान्य कोटामधून तिकीट बुक करा.

  • तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी लोवर बर्थ अलॉट केले आहेत. त्यानंतर जर सीट असेल तरच तुम्हाला लोवर बर्थ सीट मिळेल.

  • जर तुम्ही आरक्षितमधून तिकीट बुक केले आणि तिथे लोवर बर्थ अलॉट केले असेल तरच तुम्हाला ती सीट मिळेल.

  • जो व्यक्ती सर्वप्रथम तिकीट बुक करेल त्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतरच तुम्हाला सीट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT