Swadhar Yojana: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार ५१ हजारांची मदत; काय आहे स्वाधार योजना, कसा घेता येईल लाभ? वाचा...

Swadhar Yojana For Students Education: महाराष्ट्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना आहे. स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकार आर्थिक मदत करते.
Swadhar Yojana
Swadhar YojanaSaam TV
Published On

सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात अनेक योजना महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. सरकारच्या अनेक योजना या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यातील एक योजना म्हणजे स्वाधार योजना.

स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते.

Swadhar Yojana
SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

काय आहे स्वाधार योजना?

महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची सुरुवात केली. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली हे. याचसोबत दुसऱ्या शहराक राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतर्ख राहण्याची सुविधा दिली जाते.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच तुम्ही जर दहावी किंवा बारावीनंतर कोणत्याही कोर्समध्ये अॅडमिशन घेत असाल तर त्याला कालावधी २ वर्षांपेक्षा जास्त असावा. तसेच विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. या योजनेत लाभ घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे स्वतः चे बँक अकाउंट असावे.

स्वाधार योजनेअंतर्गत बोर्डिंगच्या सुविधेसाठी २८ हजार रुपये दिले जातात. लॉजिग सुविधेसाठी १५ हजार रुपये दिले जातात. तसेच मेडिकल, इंजिनियरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पाच हजार रुपये मिळतात.

Swadhar Yojana
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

अर्ज कसा करायचा?

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर होम पेजवर असलेला स्वाधार योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

  • यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर जवळील समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागेल.

  • यानंतर तुमची अर्जप्रक्रिया पूर्ण होईल.

Swadhar Yojana
Government Scheme For Farmers : खुशखबर! शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंचे कर्ज; काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? जाणून घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com