Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अमेरिकेत शिक्षणासाठी गेली अन् सातासमुद्रापार सुरु केली ७५ हजार कोटींची कंपनी;पुण्याच्या नेहा नारखेडे यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of Neha Narkhede: नेहा नारखेडे यांनी अमेरिकेत स्वतः ची कंपनी उभारली आहे. त्या अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या होत्या. शिक्षणासोबतच त्यांनी स्वतः चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

आयुष्यात सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला कधीच अपयश येत नाही. कितीही वाईट परिस्थिती असली तरीही त्यावर मात करायची असते. असंच काहीसं नेहा नारखेडे यांनी केलं. पुण्याच्या लेकीने थेट अमेरिकेत आपला स्वतः चा व्यवसाय सुरु केली आहे. त्यांनी खूप कमी वयात यश मिळवलं आहे. त्यांनी सातासमुद्रापार कंपनी सुरु केली. (Success Story)

नेहा या अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या.त्यांच्या कंपनीची वॅल्यू ७५ हजार करोड रुपये आहे. अमेरिकेतली सेल्फ मेड महिलांमध्ये त्यांचा नंबर येतो.

नेहा यांचा जन्म भारतात झाला. त्यांचे बालपण पुण्यात गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून कॉम्प्युटर शिक्षण केले. त्यानंतर त्यांना ओरेकलमध्ये नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी स्वतची कंपनी कोन्फ़्लुएंट सुरु केली. (Success Story of Neha Narkhede)

नेहा आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी २०१४ मध्ये नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी स्वतः ची कंपनी सुरु केली. त्या पाच वर्ष चीफ टेक्नोलॉजी आणि प्रोडक्ट ऑफिसर म्हणून काम केले. त्या आता कंपनीच्या बोर्ड मेंबर आहेत. नेहा यांनी खूप कमी वयात कंपनी सुरु केली आणि ती यशाच्या शिखरावरदेखील पोहचवली. त्यांनी स्वतः च्या हिंमतीवर हे यश मिळवलं आहे.

नेहा यांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. २०२१ मध्ये जेव्हा त्यांच्या कंपनीचा आयपीओ आला होता तेव्हा त्यांची नेटवर्थ १३,३८० कोटी रुपये झाली होती. २०२२ मध्ये त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. एका वर्षात त्यांनी जवळपास ८६०० कोटी रुपये गमावले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न करुन कंपनी उभारली. २०२३ च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कंपनीची किंमत ७५ हजार कोटी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT