Neha Dhupia: नेहा धुपिया अचानक सेटवर बेशुद्ध, वाचा पुढे काय झालं

Neha Dhupia Health Update : बॉलिवूडची अभिनेत्री नेहा धुपिया रोडीजच्या सेटवर बेशुद्ध पडली. आता तिचे हेल्थ अपडेट जाणून घ्या.
Neha Dhupia Health Update
Neha DhupiaSAAM TV
Published On

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) कायम तिच्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. मात्र आता तिच्या बद्दल चिंताजनक माहिती समोर आली आहे. नेहा धुपियाची तब्येत बिघडली आहे. नेहा रिॲलिटी शो 'एमटीव्ही रोडीज XX' चे शूट करताना ही घटना घडली आहे. 'एमटीव्ही रोडीज XX' ची गँग लीडर नेहा धुपिया आहे. सेटवर अचानक नेहाची तब्येत बिघडली आहे. रिॲलिटी शोचे शूटिंग सुरू असताना अचानक ती बेशुद्ध पडली आहे. सेटवरचे सर्वच नेहाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

थोड्या वेळाने नेहा धुपिया शुद्धीवर आली आणि आपण ठीक असल्याचे सांगितले आणि आपले शूटिंग पुढे सूरू ठेवले. यावर नेहा प्रतिक्रिया देत म्हणाली, " हा माझा छोटा हेल्थ इश्यू आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. " नेहा धुपिया शोचे शूटिंग रद्द न करता फक्त काही वेळासाठी छोटा ब्रेक घेतला आणि पुन्हा कामावर परतली. सध्या नेहा तिच्या कामामुळे खूप व्यस्त असलेली पाहायला मिळाली. कामानिमित्त नेहाला अनेक वेळा मुलांपासून दूर परदेशात जावे लागते. त्यामुळे बदलते वातावरण, धावपळ, बाहेरचं खाणे यामुळे तिची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे.

नेहा धुपिया आपल्या धडाकेबाज स्वभावासाठी ओळखली जाते. नेहाच्या आजारपणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. तिचे चाहते आणि कलाकार तिच्यासाठी चिंता व्यक्त करत आहे. बेशुद्ध होऊनही पुन्हा कामाला लागल्यामुळे तिने दाखवून दिले आहे की, 'एमटीव्ही रोडीज XX' ची लीडर बनण्यासाठी आपण योग्य आहोत. शुद्धीवर आल्यानंतर नेहा चांगली चालत-फिरत होती.

नेहा धुपियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 7 मिलियन फॉलोअर्स आहेत. कायमट आपल्या लूकचे फोटो शेअर करत असते. आपल्या कामाच्या अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत राहते. नेहा आपल्या कामात खूप ॲक्टिव्ह असते. 'एमटीव्ही रोडीज XX' हा ॲक्शन, ड्रामा आहे. रोडीज या शोसाठी नेहा नेहमी एक्साइटेड असते.

Neha Dhupia Health Update
Deva Box Office Collection : ॲक्शनचा धमाका 'देवा', पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com