Success Story: ३ वर्षे मोबाइलपासून लांब राहिली, चौथ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IAS नेहा ब्याडवाल यांचा थक्क करणारा प्रवास

Success Story Of IAS Neha Byadwal: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी नेहा ब्याडवाल यांनी तीन वर्षे मोबाईलला हातदेखील लावला नव्हता.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हा असतोच. तरुणाई तर स्मार्टफोनशिवाय राहूच शकत नाही.परंतु या स्मार्टफोनच्या जगातदेखील कोणी मोबाईलशिवाय राहू शकत नाही. परंतु IAS नेहा ब्याडवाल यांनी जवळपास तीन वर्षे फोन हातात घेतला नव्हता. त्यांनी फोन हातात न घेऊन जिद्दीने यूपीएससी क्रॅक केली. (Success Story)

Success Story
Success Story: १०वी- १२वी नापास, तरीही पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अंजु शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

नेहा ब्याडवाल यांना यूपीएससी परिक्षेत पहिल्यांदा अपयश आले. त्यानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला. जवळपास तीन वर्षासाठी त्यांनी सोशल मीडियापासून लांब राहण्याचे ठरवले.त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले अन् त्यांचे आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

नेहा ब्याडवाल या मुळच्या जयपुरच्या आहेत. त्यांचे बालपण छत्तीसगडमध्ये गेले. त्यांनी वडील सरकारी नोकरीत रुजू होते. त्यांनी त्यांची अनेक ठिकाणी ट्रान्सफर होत असे. त्यामुळे नेहा यांनाही अनेक शाळा बदलाव्या लागल्या होत्या. त्यांच्या शाळा बदली झाल्या असल्या तरीही त्यांनी खूप चांगला अभ्यास केला.

नेहा यांनी रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. त्या युनिव्हर्सिटीच्या टॉपरदेखील होत्या. त्यांचे वडिल वरिष्ठ आयकर अधिकारी होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नेहा यांनी आयएएस ऑफिसर होण्याचे ठरवले. (Success Story Of IAS Neha Byadwal)

नेहा यांनी UPSC CSE ची तयारी सुरु केली आहे. पहिल्या तीन प्रयत्नात त्या यूपीएससी परीक्षा क्रॅक करु शकल्या नाहीत.परंतु त्यांनी हार मानली नाही.

नेहा यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ३ वर्ष पूर्णपणे अभ्यासासाठी दिली. या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी खूप साथ दिली.

Success Story
Success Story: १० ते ५ नोकरी, रात्रभर अभ्यास, अंगणवाडी सेविकाचा मुलगा BPSC परिक्षेत आला पहिला; उज्जवल यांची सक्सेस स्टोरी

नेहा यांनी SSC परीक्षा पास केली, परंतु त्यांनी नोकरी केली नाही. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली अन् आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर नेहा या सोशल मीडियावरदेखील खूप प्रसिद्ध झाल्या. त्या नेहमी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरित करत असतात. (Neha Byadwal Success Story)

Success Story
Success Story: शाळेसाठी ७० किमीची पायपीट, वडिलांसोबत विकला चहा, जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS हिमांशु गुप्तांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com