
मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी बीपीएससीचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये ४७० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवे. या परिक्षेत सीतामढी येथील रहिवासी असणाऱ्या उज्जवल कुमार उपकार यांनी पहिली रँक मिळवली आहे. ते गौरोल येथील ब्लॉक कल्याण अधिकारी पदावर आधीच कार्यरत होते.
प्रशासकीय सेवेत काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पूर्वीपासूनच खूप अभ्यास केला. त्यांनी हिंदी माध्यनातून परीक्षा दिली होती.ते आता डीएसपी झाले आहेत.
उज्जवल कुमार उपकार यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिली रँक मिळवला आहे. उज्जवल सध्या वैशाली जिल्ह्यातील गोरौळ येथे ब्लॉक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
उज्जवल हे मूळचे नानपूरमधील रायपूर गावचे रहिवासी. त्यांचे वडिल सुबोध ठाकूर हे खाजगी शाळेत शिक्षण आहेत. तर आई गुडिया कुमारी या अंगणवाडी सेविका आहे. सुरुवातीचे शिक्षण त्यांचे शाळेतच झाले. त्यानंतर त्यांनी बरियापूरमधून कॉलेजचे शिक्षण केले. त्यानंतर एनआयटी उत्तराखंड येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. दिल्लीत राहून त्यांनी स्पर्धा परिक्षांची तयार केली.
उज्जवल यांनी हिंदी भाषेत बीपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी याआधीही बीपीएससी परीक्षा दिली होती. तेव्हा त्यांना ४९६ रँक मिळाली होती. परंतु त्यांनी हार न मानता तयारी सुरु ठेवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.