Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Maharashtra Election news : परीक्षा फी भरली म्हणून निवडणूक आयोगाने मनसे उमेदवाराला नोटीस पाठवली.
Maharashtra Election news
Maharashtra Election newsMaharashtra Election news
Published On

Maharashtra Vidhan Sabha Election news : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. प्रचारसभांचा धुरळा सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार पराकाष्ठेचा प्रयत्न करत आहेत. पण आचारसंहिता असल्यामुळे अनेकजण अडचणीत येतात. पुण्यातील मनसे उमेदवार एका मुलांची परीक्षा फी भरल्यामुळे अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मनसेचे कसबा पेठचे उमेदवार गणेश भोकरे यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे. याची पुण्यात चर्चा सुरू आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. गणेश भोकरे यांनी मतदारसंघातील मुलांची परीक्षेची फी भरली, म्हणून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणुकी काळात तुम्ही अशा पद्धतीने फी भरू शकत नाहीत. असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

फी भरून जर मी काही चूक केली असेल तर असे अनेक गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार असल्याचे भोकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. जी लोक काम करत नाहीत त्यांच्यावर कुठले गुन्हे नसतात, मी काम करतो तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. मी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे, असे भोकरे यांनी सांगितले. पुण्यातील एस एस पी एम या शाळेमध्ये पात्रे भाऊ शिकतात. एक आठवीला आणि एक नववीला आहे. शाळेने त्यांना 75 हजार रुपये फी भरा असं सांगितलं होतं. मात्र घरची परिस्थिती नसल्याने ते फी भरू शकत नाहीत.

शाळेने त्यांना शाळेतून फी भरण्याचा तगादा लावला. पात्रे यांनी मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांची भेट घेतली व सर्व परिस्थिती सांगितली. यावेळी भोकरे हे मुलांना घेऊन शाळेत गेले व शाळेला दोन्ही मुलांचे वीस हजार रुपये फी भरली . शाळेची फी भरली म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गणेश भोकरे यांना हा खर्च निवडणूक खर्चात धरला जाईल, याबाबतची नोटीस पाठवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com