Pramod mittal businessman saam tv
बिझनेस

मुलीच्या लग्नात ५५० कोटींचा खर्च; तरीही दिवाळखोर झाला भारताचा 'हा' उद्योगपती

सुमारे 10 वर्षांपूर्वी देशात असा भव्यदिव्य विवाहसोहळा झाला होता. त्या विवाहाची जगभरात चर्चा झाली होती.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये भारतातील टॉपचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न झालं. या लग्नाची चर्चा केवळ भारतात नाही तर इतर अनेक देशांमध्ये झाली. लग्नावर झालेला खर्च पाहून लोक हैराण झाले. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, या लग्नाच्या सुमारे 10 वर्षांपूर्वी देशात असा भव्यदिव्य विवाहसोहळा झाला होता. त्या विवाहाची जगभरात चर्चा झाली होती. ज्या उद्योगपतीने या लग्नाचा खर्च उचलला होता, त्याचं आज दिवाळं निघालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

कोण आहे तो उद्योगपती?

आम्ही ज्या उद्योगपतीबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे प्रमोद मित्तल. प्रमोद मित्तल हे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू आहेत. एक काळ असा होता ज्यावेळी त्यांचं नाव देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सातत्याने येत होतं.

मात्र 2020 मध्ये प्रमोद मित्तल दिवाळखोर झाले. 2020 मध्येच लंडन कोर्टाने प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर 13 कोटी पौंडपेक्षा जास्त कर्ज होतं.

मुलीच्या लग्नात पाण्यासारखा पैसा केलेला खर्च

ज्याप्रमाणे मुकेश अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नात पैशाची पर्वा केली नाही, त्याचप्रमाणे प्रमोद मित्तल यांनी देखील 2013 मध्ये त्यांची मुलगी सृष्टीचं लग्न झाल्यावर पैशाची पर्वा केली नव्हती. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये प्रमोद मित्तल यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नावर अंदाजे 550 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे.

मित्तल यांचं दिवाळं का निघालं?

प्रमोद मित्तल यांनी बोस्नियन कोक कंपनी GIKIL च्या कर्जाची हमी घेतली होती. मात्र GIKIL ला त्याचं कर्ज फेडता आलं नाही. आता प्रमोद मित्तल याचे जामीनदार असल्याने याचा परिणाम त्यांनाही भोगावा लागला. GIKIL ने लंडनमधील स्टील ट्रेडिंग कंपनीकडून कर्ज घेतलं होतं.

GIKIL ने या कंपनीच्या कर्जाची परतफेड केली नाही तेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. या संपूर्ण प्रकरणात प्रमोद मित्तल देखील अडकले आणि त्यानंतर 2020 मध्ये प्रमोद मित्तल यांना न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलं. याआधी 2019 मध्ये त्याला बोस्नियामध्येही फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT