SIP VS PPF  Saam tv
बिझनेस

SIP VS PPF : कोणत्या गुंतवणुकीत फायदा अधिक? लाँग टर्मसाठी कोणता प्लान फायदेशीर?

SIP VS PPF : मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला कोणती गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल, जाणून घेऊयात. एसआयपी आणि पीपीएफ या दोन्ही गुंतवणुकीचे पर्याय जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Investment Plan : आता नोकरदार वर्गाचा गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. अनेक जण वेगवेगळ्या स्वरुपातील गुंतवणुकीचा पर्याय निवडू लागले आहेत. सध्या लोक म्यूचुअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करू लागले आहेत. काही जण जोखीम घेण्यास इच्छुक नसतात, त्यांच्यासाठी PPF किंवा एनपीएसची निवड करतात. एसआयपी आणि पीपीएफविषयी माहिती जाणून घेऊयात.

काय आहे SIP?

SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान. तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनानुसार, गुंतवणूक करू शकतात. ठराविक कालावधीसाठी ही गुंतवणूक करता येते. या प्लानमध्ये महिना, तीन महिना आणि वार्षिक पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये १२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. प्लानमध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही सहज १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकता.

काय आहे पीपीएफ?

पीपीएफ ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. तुम्हाला पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही ५ वर्षांनी ही गुंतवणूक वाढवू शकता. तुम्ही वर्षाला कमाल १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तुमच्या एकूण गुंतवणुकीवर ७.१ टक्के व्याज मिळते.

SIP vs PPF : कोणती गुंतवणूक फायदेशीर?

आता कोणत्या प्लानमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गोंधळात असाल, तर दोन्ही प्लानचे फायदे समजून घ्या. तुम्ही वार्षिक दोन्ही प्लानमध्ये १.५ लाखांची गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल, जाणून घ्या.

तुम्ही १५ वर्षे एसआयपीसाठी वार्षिक १.५ लाख रुपयाप्रमाणे गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक २२,५०,००० रुपये होईल. तुम्हाला या गुंतवणुकीत एकूण मोबदला ३६,९९,१४२ लाख रुपयांचा होईल. १५ वर्षांनंतर एकूण कॉर्पस हा ५९,४९,१४२ रुपये होईल. या प्लानमध्ये तुमच्या एकूण गुंतवणुकीवर १२ टक्के व्याज जोडण्यात आलं आहे.

तुम्ही पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी वार्षिक १.५ लाख रुपयाप्रमाणे गुंतवणूक केल्यास मोबदला १८,१८,२०९ रुपये मिळेल. तुम्हाला १५ वर्षांनंतर कॉर्पस हा ४०,६८,२०९ रुपये मिळेल. तुमच्या एकूण गुंतवणुकीवर ७.१ टक्के व्याज जोडण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT