लहान मुलांच्या नावाने SIP करताय? हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत

Mutual Fund SIP Investment For Minor Child: आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही लहान मुलांच्या नावाने एसआयपी करु शकतात.
SIP
SIPSaam Tv
Published On

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये कोट्यवधी लोक गुंतवणूक करतात. एसआयपीमधील लाँग टर्म गुंतवणूक ही नेहमी सुरक्षित असते. यामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. एसआयपीमधून चांगले व्याज मिळते. त्यामुळे पुढे १० किंवा २० वर्षांनी तुमच्याकडे लाखो रुपये असणार आहे. तुम्ही मुलांच्या नावाने एसआयपी सुरु करुन त्यांचे भविष्य सुरक्षित करु शकतात.

तुमचे मुल जर लहान असेल त्याच्या नावाने एसआयपी सुरु केली तर भविष्यात त्याच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या गरजांसाठी तुम्हाला आर्थिक अडचण भासणार आहे. जर लहान मुलांच्या नावाने तुम्हाला एसआयपी (Child SIP) सुरु करायची असेल तर हे नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत. (SIP)

SIP
Women Savings Scheme India: 'ही' सरकारी योजना महिलांसाठी ठरतेय खास, गुंतवणुकीवर व्याज मिळते जास्त, २ वर्षांत जबरदस्त कमाई

एसआयपीमध्ये कोणत्याही वयोगटातील लोक गुंतवणूक करु शकतात. याचसोबत कितीही रुपयांची गुंतवणूक करु शकतात. तुम्हाला रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत तुम्ही जितक्या लवकर आणि जास्तीत जास्त गुंतवणूक कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तुमच्या मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर मुलाच्या नावाने गुंतवणूक करु शकतात. यासाठी काही खास नियम आहेत.

  • एसआयपीमध्ये तुमचे मुल एकमेव होल्डर असेल, जॉइंट होल्डरला परवानगी दिलेली नाही.

  • अल्पवयीन मुलाच्या नावाने गुंतवणूक करताना त्याच्यासोबतच्या नात्याचा पुरावा द्यावा लागतो.

  • मुलाची जन्मतारीख आणि पालक यांच्यातील संबंध, जन्म दाखला, पासपोर्ट ही कागदपत्रे द्यावी लागतील.

SIP
Drone Didi Scheme: महिलांना महिन्याला मिळणार १५००० रुपये, ८ लाख रूपयांची सबसिडी, ड्रोन दीदी योजनाबद्दल जाणून घ्या
  • याचसोबत केवायसीच्या नियमांचे पालन करायला हवे. मुलांच्या खात्यातून तुम्ही थेट व्यव्हार करु शकतात. परंतु पालकांच्या बँक खात्याद्वारे करायचे असेल तर थर्ड पार्टी फॉर्म द्यावा लागणार आहे.

  • मूल अल्पवयीन म्हणजेच १८ वर्षांचे असेपर्यंतच हे नियम लागू होणार आहे. १८ वर्षांचे झाल्यानंतर एसआयपी बंद करावी लागेल. अल्पवयीन मुल १८ वर्षांचे होण्याआधीच नोंदणीकृत पत्त्यावर नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर काही कागदपत्रे आणि अर्ज सादर करण्यास सांगितले जाईल.

वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

SIP
NPS Scheme: १.६२ कोटी रुपये एकरकमी अन् महिन्याला १ लाख रुपये पेन्शन; NPS योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com