Todays Horoscope: 'या' राशीसाठी जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल, जाणून घ्या आजचं भविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

घरातील लोकांच्या कौतुकामध्ये मन व्यस्त राहील. जुनी गुंतवणूक आज फायदा देईल.

वृषभ

कलाकारांना दिवस नव्या छान संधी घेऊन आला आहे. दिवसाची परिणिती यश असे म्हणता येईल.

मिथुन

श्रद्धेने कार्य कराल तर यश मिळेल. देवावर विश्वास दृढ होईल.

कर्क

प्रॉपर्टीच्या वाटण्या किंवा तत्सम गोष्टी बोलणी, बैठका आज दिसत आहेत. धावपळीचा दिवस आहे.

सिंह

राशीप्रमाणे स्वभावाचा विचार केला तर आपण कुठेच कधी वाकत नाही. ताठ मानेने जगण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो.

कन्या

पोटाचे दुखणे आणि त्रास सतावतील. दिवस संमिश्र आहे.

तूळ

देवी उपासना आज चांगली ठरेल. मनासारख्या घटना घडतील.

वृश्चिक

घर खरेदी विक्रीचे व्यवहार आज पार पडतील. घरातील लोकांना कडून आपल्याला सन्मान मिळेल.

धनु

छोटे प्रवास घडतील. मात्र आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी लागेल.

मकर

घर खरेदी विक्री मधून लाभ होईल. कुटुंबीयांच्या सल्ल्याने पुढे जाल.

कुंभ

व्यक्तिमत्व खुलण्यासाठी अनेक प्रयोग कराल. सुप्तपणे पुढील कामांची आखणी कराल.

मीन

नको त्या गोष्टीचा आज ताण घेऊ नका. पैशाचा अपव्यय टाळा.