Post office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office SCSS Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २.४६ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीजन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला फक्त व्याजातून २.४६ लाख रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन योजना

फक्त व्याजातून मिळणार २.४६ लाख रुपये

एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला २०,००० रुपये मिळवा

प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी कुठे ना कुठे आर्थिक बचत करायची असते. प्रत्येक महिन्याला जर तुम्ही काही रक्कम बाजूला काढून ठेवली तर तु्म्हाला काही वर्षांना नक्कीच चांगला परतावा मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही कोट्यवधी रुपये कमवू शकणार आहात. या योजनेत तुम्हाला इतर अनेक फायदेदेखील मिळणार आहेत.

दर महिन्याला मिळणार २०,००० रुपये

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन योजनेत जर तुम्ही खूप आधीपासून गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला २०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे नक्की मिळतील. यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन योजनेत तुम्हाला चांगले व्याजदरदेखील मिळते. या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुमच्या गुंतवणूकीच्या रक्कमेवर परतावा ठरतो. या योजनेत इतर योजनांच्या तुलनेत चांगले व्याजदर मिळते. याचसोबत तुम्हाला १.५ लाखांपर्यंत कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती अकाउंट उघडू शकतात. सिविल क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांनी वीआरएस घेतल्यावरदेखील अकाउंट उघडू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जर तुम्ही एकावेळी ३० लाख रुपये गुंतवले त्यावर तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळणार आहे. याच हिशोबाने तुम्हाला वर्षाला २.४६ लाख रुपये व्याज मिळणार आहे. यातून तुम्हाला दर महिन्याला २०,५०० रुपये मिळणार आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो.या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट ओपन करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT