Post Office Monthly Income Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 1000 रुपयांपासून गुंतवणूक करुन दरमाह कमाईची संधी

POMIS Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करुन आपण योग्य परतावा मिळवू शकतो.

कोमल दामुद्रे

Post Office Scheme:

आपल्या प्रत्येकाला भविष्याची चिंता सतावू लागते. वाढत्या महागाईमुळे आपल्याला प्रत्येकाला पैसे कमावण्याचे अनेक नवीन मार्ग शोधावे लागतात. त्यासाठी आपण अनेक नवनवीन योजना शोधत असतो.

पैसे दुप्पट होण्यासाठी आपण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. जर तुम्हाला कमी पैशात योग्य गुंतवणूक करुन अधिक पैसे कमवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करुन आपण योग्य परतावा मिळवू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ही योजना काय आहे?

पोस्ट ऑफिस (Post Office) मंथली इन्कम स्कीम (POMIS) ही भारत सरकारद्वारे तयार केलेली स्मॉल सेव्हिंग योजना आहे. जी गुंतवणूकदारांना दर महिन्याला ठराविक रक्कम देते. या रक्कमेवर मिळणारे व्याजदर (Interest Rate) महिन्याला गुंतवणूकदारांना दिले जाते. ही योजना काय आहे? याचा व्याजदर किती? जाणून घेऊया.

2. पात्रता काय आहे?

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला भारताचे रहिवासी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही एनआरआय असाल तर या योजनेत गुंतवणूक (Investment) करु शकत नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय १० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

3. गुंतवणूक किती करु शकता?

या योजनेमध्ये सिंगल अकाउंट होल्डर असल्यास किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता. जर तुमचे जॉइंट अकाउंट खाते असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये आणि जास्ती जास्त १५ लाख रुपये गुंतवता येतील.

4. व्याजदर किती आहे?

सरकार तुम्हाला १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महिन्याच्या उत्पन्न योजनेवर वार्षिक ७.४ टक्के व्याज देईल.

5. अटी आणि शर्ती काय आहेत?

  • पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडल्यास ते ५ वर्षांपर्यंत राहाते.

  • ठेवीच्या तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही.

  • खाते उघडण्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 2 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम देण्यात येईल.

  • 3 वर्षांनंतर आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 1 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT