Google For India 2023 : ChromeBook नंतर आता Google Pixel 8 ही भारतात बनणार, पाहा सर्व तपशील

Google Pixel 8 Produced In India : Google चा वार्षिक कार्यक्रम म्हणजेच Google For India 2023 आज दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.
Google For India 2023
Google For India 2023Saam Tv
Published On

Google For India :

Google चा वार्षिक कार्यक्रम म्हणजेच Google For India 2023 आज दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होता. सध्या गुगलने सांगितले आहे की, क्रोमबुकनंतर पिक्सेल फोनही भारतात बनवले जातील.

कंपनीने नुकताच लॉन्च (Launch) केलेला स्मार्टफोन सिरीज Pixel 8 देखील भारतात तयार केला जाईल. हे प्रोडक्ट 2024 पर्यंत तयार होतील. मात्र, मोठी गोष्ट म्हणजे कंपनीच्या सूचनेनुसार क्रोमबुकचे उत्पादन सुरू झाले आहे.

Google चा वार्षिक कार्यक्रम म्हणजेच Google For India 2023 आज दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला होता. जिथे कंपनी अनेक मोठ्या घोषणा करेल अशी अपेक्षा होती.

प्रिमियम फोनच्या मागणीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे

  • भारतात अँड्रॉइड वापरकर्ते खूप आहेत हे आपल्याला माहीत आहे. अशा स्थितीत गुगलने (Google) भारताकडून शिकून अँड्रॉइड सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Pixel 8 आणि Pixel Watch 2 ला भारतात लाँच करण्यासाठी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

  • एवढेच नाही तर 2022 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढीसह प्रीमियम स्मार्टफोन्सच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Google For India 2023
IPhone 15 Vs Google Pixel 8: कोणता आहे तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या...

क्रोमबुकची निर्मिती भारतात केली जाईल

  • Google ने HP सोबत एक परवडणारा लॅपटॉप (Laptop) तयार केला आहे.

  • गुगल लवकरच भारतात स्वस्त दरात HP क्रोमबुकचे उत्पादन सुरू करणार आहे.

  • याशिवाय, हे Google उपकरण ChromeOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतील, जे Windows आणि macOS वर काम करणार्‍या लॅपटॉपपेक्षा खूपच स्वस्त असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com