IPhone 15 Vs Google Pixel 8: कोणता आहे तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या...

IPhone 15 Vs Google Pixel 8: कोणता आहे तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या...
IPhone 15 Vs Google Pixel 8
IPhone 15 Vs Google Pixel 8Saam Tv
Published On

iPhone 15 Vs Google Pixel 8: 

अॅपल आणि गुगल या दोन्ही कंपन्यांनी या वर्षी त्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. iPhone 15 सीरीज आणि Pixel 8 सीरीज लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दोन्ही स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येतात.

ज्यामध्ये फास्ट प्रोसेसर, चांगले कॅमेरे आणि मोठे अपग्रेड उपलब्ध आहेत. आता बरेच लोक दोन फोनमध्ये गोंधळलेले आहेत की कोणता खरेदी करणे चांगले आहे, कारण दोन्हीची किंमत अगदी समान आहे. किंमतींच्या तुलनेपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घेऊ संपूर्ण माहिती...

IPhone 15 Vs Google Pixel 8
Honda ची ही बाईक घेतली की पेट्रोलची चिंता संपेल, देते 65 Kmpl चा जबरदस्त मायलेज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

iPhone 15 Vs Google Pixel 8 किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Apple ने गेल्या वर्षी iPhone 14 इतक्या किमतीत iPhone 15 लॉन्च करण्यात आला आहे. 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 1,09,900 रुपये आहे.  (Latest Marathi News)

दुसरीकडे Google Pixel 8 128GB आणि 256GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. 128GB व्हेरिएंटची किंमत 75,999 रुपये आहे, तर 256GB व्हेरिएंटची किंमत 82,999 रुपये आहे.

डिझाइन आणि डिस्प्ले

iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे आणि हा पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेग्युलर नॉच ऐवजी, Apple ने आयफोन 15 च्या सर्व प्रकारांमध्ये डायनॅमिक आयलंड नॉच दिला आहे. जो गेल्या वर्षी आयफोन 14 प्रो मॉडेल्सवर आढळला होता.

IPhone 15 Vs Google Pixel 8
Amazon सेल सुरू, 86 हजारांचा 58 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23 हजारात खरेदी करण्याची संधी

Google Pixel 8 चे डिझाईन देखील मागील प्रमाणेच आहे. फोन Pixel 7 पेक्षा थोडा लहान आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंचाचा Actua डिस्प्ले आहे. फोन 2,000 nits च्या पीक ब्राइटनेस आणि Gorilla Glass Victus सह येतो. फोन ग्लास आणि अॅल्युमिनियम डिझाइनसह येतो आणि तीन रंग पर्यायांमध्ये ऑफर जात आहे.

कॅमेरा

Apple ने सुधारित 48-मेगापिक्सेल परीमारी कॅमेरा सेन्सरसह,iPhone 15 च्या कॅमेरा क्षमतांमध्ये मोठे अपग्रेड केले आहेत. फोन कमी प्रकाशात फोटोग्राफी आणि पोर्ट्रेट शॉट्समध्ये चांगली परफॉर्मन्स देतो. दुसरीकडे Google Pixel 8 ला देखील प्रमुख कॅमेरा अपडेट देण्यात आले आहेत. नवीन पिक्सेलमध्ये ट्रिपल-कॅमेरा कॉन्फिगरेशन आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा ऑक्टा-पीडी प्रायमरी कॅमेरा, 8x सुपर-रेस डिजिटल झूम लेन्स, ऑटोफोकस आणि मॅक्रो कॅमेरासह सुसज्ज 12-मेगापिक्सेल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या पुढील बाजूस 10.5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

सॉफ्टवेअर आणि परफॉर्मन्स

iPhone 15 मध्ये iPhone 14 Pro प्रमाणेच A16 Bionic प्रोसेसर आहे. A16 Bionic प्रोसेसर iPhone 14 मधील A15 Bionic प्रोसेसरपेक्षा वेगवान आहे. A16 बायोनिक प्रोसेसर गेमिंग दरम्यान चांगले ग्राफिक्स आणि चांगली परफॉर्मन्स देतो. असं असलं तरी iPhone 15 Pro Apple ने आपला A17 Bionic प्रोसेसर दिला. यावेळी गुगलने आपल्या Pixel फोनमध्ये Tensor G3 चिपसेट दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com