Honda ची ही बाईक घेतली की पेट्रोलची चिंता संपेल, देते 65 Kmpl चा जबरदस्त मायलेज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Best Mileage Bike : Honda ची हे बाईक घेतली की पेट्रोलची चिंता संपले, देते 65 Kmpl चा जबरदस्त मायलेज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Honda Shine 125
Honda Shine 125Saam Tv
Published On

Honda Shine 125:

दुचाकी वाहनांमध्ये 125 सीसी इंजिन असलेल्या बाईकला मोठी मागणी आहे. परवडणारी किंमत आणि जास्त मायलेज असलेली या बाईक स्टायलिश लुक आणि आरामदायी राइड सारख्या फीचर्ससह येतात. यामध्येच एक बाईक आहे ती म्हणजे होंडाची शाईन 125. या बाईकचा टॉप स्पीड 100 किमी/तास आहे.

65 Kmpl चा जबरदस्त मायलेज

Honda Shine 125 फक्त 13.43 सेकंदात 100 किमी/ताशी वेग गाठते. ही बाईक 65 Kmpl चा मायलेज देते. या बाईकची प्रारंभिक किंमत 78,687 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. याचे ओपी मॉडेलची किंमत 83,800 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Honda Shine 125
Amazon सेल सुरू, 86 हजारांचा 58 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23 हजारात खरेदी करण्याची संधी

चार प्रकार आणि आठ रंग पर्याय

ही होंडा बाईक चार प्रकारांमध्ये आणि आठ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये 123.94 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. सुरक्षेसाठी बाईकला समोर डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. बाईकचे एकूण वजन 114 किलो आहे. या बाईकमध्ये 10.5 लिटरची इंधन टाकी आहे. (Latest Marathi News)

Honda Shine 125 मध्ये 10.74 PS ची पॉवर मिळते. ही बाईक 11 Nm टॉर्क देते. ही नवीन जनरेशन बाईक आहे, ज्यामध्ये एलईडी हेडलाइट, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्विन पॉड क्लस्टर, ओडोमीटर आणि इंधन गेज यांसारखी फीचर्स आहेत.

Honda Shine 125
Toyota New Off Roading SUV : टोयोटोची जबरदस्त एसयूव्ही येतेय; स्वस्तात मिळणार ऑफ रोडिंगची मजा

सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन

बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट आणि आरामदायी सीट देण्यात आली आहे. Honda Shine 125 बाजारात बजाज CT 125X, Hero Super Splendor आणि Bajaj Pulsar 125 शी स्पर्धा करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com