SIP Investment Calculator: 10 वर्षांत कोट्यधीश व्हायचंय? महिन्याला फक्त इतके पैसे गुंतवा, जाणून घ्या डीटेल्स

SIP Return Calculator : महिन्याभरात उरलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवूण त्यांचा परतावा किती मिळतो हे प्रत्येकाला वाटत असते.
SIP Calculator
SIP CalculatorSaam tv

Monthly Investment : करोडपती होण्याची स्वप्न हल्ली सगळेच बघतात. अनेक छोट्या छोटया गोष्टींमधून आपण साठवणूक करतो. महिन्याभरात उरलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवूण त्यांचा परतावा किती मिळतो हे प्रत्येकाला वाटत असते.

कुणाला कार घ्यायची असते तर कुणाला घर यासाठी प्रत्येक जण जास्त प्रमाणात पैसे कुठून मिळतील हे बघत असतात. जर तुम्हाला 10 वर्षांनंतर कोट्यधीश बनण्याचे असेल तर आजपासूनच गुंतवणूक सुरु करा.

SIP Calculator
ITR Filing Of Deceased Person: मृत व्यक्तीचे सुद्धा भरता येणार Income Tax Return, जाणून घ्या कशी असेल प्रोसेस

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करता तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजार (Market) देखील तपासायला हवे. बरेचदा आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसताना आपण गुंतवणूक करतो पण हवा तसा परतावा न मिळाल्यानंतर आपले स्वप्न भंग पावते. पण योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करायची हे सांगणार आहोत.

अधिक काळासाठी गुंतवणुकीचे नियोजन करताना दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली वाढती महागाई आणि दुसरी रुपयाच्या मूल्यातील घसरण. SIP या दोन्ही घटकांवर अवलंबून असते. 10 वर्षात करोडपती होण्यासाठी दर महिन्याला किती SIP करावे लागेल हे जाणून घेऊया

SIP Calculator
Why Women Choose Younger Men To Love : महिलांना कमी वयाचे पुरुष जास्त का आवडतात ? कारण ऐकून धक्काच बसेल

10 वर्षांत 1 कोटीचा निधी तयार करण्यासाठीची SIP रक्कम तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावर अवलंबून असते. तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक केली त्याचा सरासरी परतावा ८% असेल, तर दरमहा ५,४२,९९९ रुपयांची एसआयपी करावी लागेल. तसे, म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजना दीर्घकालीन 12-15% परतावा देतात.

वार्षिक सरासरी परतावा 10% असल्यास, दरमहा 48414 रुपयांची एसआयपी करावी लागेल. सरासरी 15% परतावा मिळाल्यावर, दरमहा 35,887 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, मिळालेला परतावा 25% असल्यास, दरमहा केवळ 18,769 रुपयांची एसआयपी करावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com