कोमल दामुद्रे
लग्न करताना मुलगा हा मुलीपेक्षा निदान एक ते दोन वर्षांनी मोठा असावा असे शास्त्रात नेहमीच सांगितले जाते.
हल्ली हे चित्र बदलले आहे असे दिसून येते.
सध्या महिला या त्यांच्यापेक्षा कमी असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडतात व लग्न देखील करतात
जर्नल ऑफ सेक्स रिसर्च चॅलेंजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात स्त्रिया आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांकडे का आकर्षित होतात याची कारणे समोर आली आहेत.
यामधून असे समजण्यात आले की, त्यांना अनेक सामाजिक परंपरा आवडत नाहीत.
तरुण पुरुषांसोबतचे लैंगिक जीवन खूप समाधानकारक असते.
बहुतेक स्त्रिया त्यांच्या लैंगिक सहनशक्तीमुळे त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात.
लहान मुलाला डेट करताना मुलींचा आत्मविश्वास वाढू लागतो.
अनेक स्त्रिया त्यांच्या वयाच्या पुरुषांकडे फारशा आकर्षित होत नाहीत, कारण ते वयानुसार जास्त कठोर होतात.
फिल्मी दुनियेत अशा अनेक सुंदर नायिका आहेत, ज्यांनी स्वतःहून लहान असलेल्या नवऱ्याची निवड केली आहे.