Post Office Scheme Yandex
बिझनेस

Post Office Scheme: आजच गुंतवणूक करा! भरघोस व्याजासोबत पैसे दुप्पट होणार, पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Kisan Vikas Patra Yojana: किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. या योजनेत पैसे दुप्पट केले जातात. ही सरकारी योजना असल्यामुळे पैसे बुडण्याचा धोका नाही.

Rohini Gudaghe

Post Office Saving Scheme

आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. गुंतवणूकीसाठी आपण सरकारी योजनांना (Post Office Scheme) प्राधान्य देतो. अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसची नागरिकांसाठी किसान विकास पत्र ही योजना आहे. या योजनेमुळे नागरिकांचा मोठा फायदा होतो. (Latest News)

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) किंवा केव्हीपी पोस्ट ऑफिसद्वारे लहान बचत योजनेअंतर्गत चालवले जाते. या योजनेचा फायदा असा आहे की, यामध्ये जमा करणाऱ्या व्यक्तीला पैसे दुप्पट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ही पोस्ट ऑफिस योजना असल्याने पैसे गमावण्याचा धोका नाही. गुंतवणूक परिपक्व होईपर्यंत पैसे दुप्पट होतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किसान विकास पत्र योजना काय आहे

सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीसाठी किसान विकास पत्रावर 7.5 टक्के व्याज जाहीर केले आहे. यानुसार तुम्ही किसान विकास पत्रामध्ये 115 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे दुप्पट (Kisan Vikas Patra Yojana) होतील. उदाहरणार्थ, आज जर एखाद्या व्यक्तीने किसान विकास पत्रामध्ये 115 महिन्यांसाठी एक लाख रुपये गुंतवले, तर परिपक्वतेवर त्या व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतील.

व्याजदरात वाढ होण्यापूर्वी किसान विकास पत्रातील पैसे 123 महिन्यांत दुप्पट होत होते. परंतु, व्याजदर वाढल्याने पैसे दुप्पट करण्याचा कालावधी कमी होत गेला आहे. आता 115 महिन्यांमध्ये पैसे दुप्पट होत आहेत.

किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणूक

तुम्ही 1,000 रुपयांपासून किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू (Post Office Saving Scheme) शकता. तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये कर सवलतीचा लाभ देखील मिळतो.

आयकराच्या कलम 80C अंतर्गत, शेतकरी एका आर्थिक वर्षात किसान विकास पत्रामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळवू शकतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील KVP मध्ये खाते उघडू (Investment) शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT