PM Svanidhi Yojana: तरूणांनी लाभ घ्या! फक्त आधारकार्डवर मिळणार कर्ज, केंद्र सरकारची भन्नाट योजना

Latest Sarkari Yojana: केंद्र सरकारनं तरूणांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेत व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिलं जातं.
Sarkari Yojana
Sarkari YojanaYandex
Published On

PM Svanidhi Yojana Loan Details

केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. यापैकी एक सरकारी योजना पीएम स्वानिधी योजना (PM Svanidhi Yojana) आहे. देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. (Latest News)

ज्यांना स्वत:चा व्यवसाय करायचा आहे, अशा लोकांसाठी ही योजना आहे. या योजनेत व्यवसाय करण्यासाठी तरूणांना कर्ज दिलं जातं. फक्त आधारकार्डवर कर्ज दिलं (PM Svanidhi Yojana Loan) जातं. शिवाय काहीही तारण ठेवण्याचं किंवा कोणत्याही हमीची गरज नाही. ही योजना तरूणांना किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किती कर्ज मिळू शकते

केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना आणत असते. अनेकांना स्वतःच्या मालकीचा व्यवसाय सुरू करायचा (Sarkari Yojana) असतो. मात्र, अनेकदा पैशांची खूप अडचण येते. अशा लोकांसाठी पीएम स्वानिधी योजना फायदेशीर आहे.

मोदी सरकार पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला विश्वासार्हता निर्माण करावी लागते. त्यामुळे या योजनेअंतर्गत कोणालाही 10,000 रुपयांचे पहिलं कर्ज मिळू (PM Svanidhi Yojana Benefits) शकते. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.

Sarkari Yojana
RBI Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; रेपो रेट जैसे थे; Home Loan, Car Loan च्या EMI वर काय परिणाम होणार?

कर्ज कसे मिळवायचे

समजा एखाद्याला मार्केटमध्ये कपड्याचे दुकान सुरु करायचं आहे. त्यासाठी त्यांनी स्वानिधी योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचे कर्ज घेतलं. त्यानंतर त्यांनी कर्जाची रक्कम वेळेवर परत (PM Svanidhi Yojana Loan Details) केली. अशा परिस्थितीत ती व्यक्ती दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकते. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तो पात्र ठरणार आहे.

या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावर सबसिडीही (Latest Utility News) देते. या योजनेच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करु शकता. ही योजना स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देते. 

Sarkari Yojana
Bank Loan Intrest Rates: वर्षाच्या पहिल्याच महिन्यात नागरिकांना झटका, अनेक बँकाचे कर्जाचे व्याजदर वाढले, चेक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com