जानेवारी 2024 मध्ये अनेक बँकांनी त्यांच्या कर्ज दरांमध्ये बदल केला आहे. आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, पीएनबी, बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांनी त्यांच्या MCLR दरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेनेही त्यांच्या दरांमध्ये समायोजन (Bank Loan Interest Rates) केलंय. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या. (latest bank news) आपण ज्या बॅंकांनी त्यांच्या कर्जदरात बदल केलाय. त्या बॅंकेची यादी पाहु या.
आयसीआयसीआय बॅंक
आयसीआयसीआय बॅंकेने त्यांच्या एमसीएलआरमध्ये १० अंकांनी वाढ केली आहे. याबाबत आयसीआयसीआय बॅंकेने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. आयसीआयसीआय बॅंकेने MCLR-आधारित कर्ज दर ८.५ टक्क्यावरून ८.६ टक्क्यावर समायोजित केला गेला आहे. याव्यतिरिक्त, तीन महिन्यांचा दर ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के तर, सहा महिन्यांचा दर ८.९० टक्क्यांवरून ९ टक्के आणि एक वर्षाचा दर ९ टक्क्यावरून ९.१० टक्के करण्यात आला (Bank Loan Interest Rates) आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंजाब नॅशनल बॅंक
पंजाब नॅशनल बॅंकेच्या (PNB) वेबसाइटनुसार, 1 जानेवारीपासून बँकेने आपल्या कर्जदरात किंचित वाढ केलीय. एक महिन्याचा व्याजदर आता ८.२५ टक्क्यांवरून ८.३० टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा दर ८.३० टक्क्यांवरून ८.४० टक्के झालाय. सहा महिन्यांचा दर ८.५५ टक्क्यांवरून ८.६० टक्के झालाय. एक वर्षाचा दर ८.६५ टक्क्यांवरून ८.७० टक्के झाला आहे.
येस बँक
येस बँकेच्या (YES bank) वेबसाइटवरील माहितीनुसार, नवीन दर १ जानेवारीपासून लागू होत आहेत. एका महिन्यासाठी MCLR-आधारित कर्ज दर रात्रीचा ९.२ टक्क्यांवरून ९.४५ टक्के आहे. तीन महिन्यांचा दर १० टक्के आहे, सहा महिन्यांचा दर १०.२५ टक्के आहे आणि एक वर्षाचा दर १०.५० टक्के आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाच्या (bank of India) वेबसाइटवरील माहितीनुसार, 1 जानेवारीपासून प्रभावी, रात्रभर बँकेने ५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. दर ७.९५ टक्क्यांवरून आता ८ टक्के झाला आहे. एका महिन्यासाठी MCLR-आधारित कर्ज दर ८.२५ टक्के, तीन महिन्यांचा दर ८.४० टक्के, सहा महिन्यांचा दर ८.६० टक्के आणि एक वर्षाचा दर ८.८० टक्के झाला आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाने (bank of baroda) १२ जानेवारी २०२३ पासून त्याचा MCLR समायोजित केला आहे. रात्रीचा MCLR पूर्वीच्या ८ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एक महिन्याचा MCLR ८.३ टक्के आहे. तीन महिन्यांचा MCLR देखील ८.४ टक्क्यांवर स्थिर आहे. सहा महिन्यांच्या MCLR मध्ये मागील ८.५५ टक्क्यांपेक्षा ५ बेस पॉईंट्सने ८.६० पर्यंत वाढ झाली आहे. एक वर्षाचा MCLR आता ८.८० टक्के आहे. पूर्वीच्या ८.७५ टक्के होता.
कॅनरा बँक
बँकेने (canara bank) जानेवारी 2023 पासून वेगवेगळ्या कालावधीत आपले कर्ज दर ५ आधारभूत पॉइंट्सने वाढवले आहेत. रात्रीचा दर ८ टक्क्यांवरून ८.५ टक्के झाला आहे. एक महिन्याचा दर आता ८.१ टक्क्यावरून आता ८.१५ टक्के झालाय. तीन महिन्यांचा दर ८.२० टक्क्यावरून ८.२५ टक्के झालाय. सहा महिन्यांचा दर ८.५५ टक्क्यांवरून ८.६० टक्के झालाय. एक वर्षाचा दर आता ८.७५ टक्क्यांवरून ८.८० टक्के झाला आहे. दोन वर्षांचा दर ९.१० टक्क्यापर्यंत वाढला आहे. तीन वर्षांचा दर ९.२० टक्के आहे. याव्यतिरिक्त, 12 जानेवारीपासून कॅनरा बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) ९.२५ टक्के आहे.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेचा (hdfc bank) कर्ज दर ८.८० टक्क्यांवरून ९.३० टक्के झालाय. दर १० बेस पॉइंट्सने वाढलाय. एक महिन्याचा दर ५ बेस पॉईंटने वाढून ८.८० टक्के झाला. तीन महिन्यांचा दर ९ टक्क्यांवर जाईल. सहा महिन्यांचा दर आता ९.२० टक्के झाला आहे. एका वर्षाचा दर ९.२५ टक्के आहे. ३ वर्षांचा दर ९.३० टक्के आहे.
आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँकेच्या (idbi bank) वेबसाइटवरील माहितीनुसार, रात्रभर कालावधीसाठी सर्वात अलीकडील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) ८.३ टक्के आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR रेट ८.४५ टक्के आहे. तर आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी तीन महिन्यांचा MCLR दर ८.७५ टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.९५ टक्के, एक वर्षाचा MCLR ९ टक्के, दोन वर्षांचा MCLR ९.५५ टक्के आणि तीन वर्षांचा MCLR ९.९५ टक्के आहे. हे दर १२ जानेवारीपासून लागू होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.