Banking Tips: चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास परत मिळतात का? जाणून घ्या नियम

Bank News: आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकजण डिजिटल पद्धतीने पैशांचा व्यवहार करतो. एखादी वस्तू खरेदी करायची असो किंवा कुणाला पैसे पाठवायचे असो, लोक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना दिसतात.
Banking Tips
Banking TipsSaam Tv
Published On

Banking Tips:

आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकजण डिजिटल पद्धतीने पैशांचा व्यवहार करतो. एखादी वस्तू खरेदी करायची असो किंवा कुणाला पैसे पाठवायचे असो, लोक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना दिसतात. ऑनलाइन पेमेंटमुळे बर्‍याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यातच गेल्या काही वर्षांत लोक ऑनलाइन शॉपिंगही खूप करतात.

या सगळ्यात जर आपण पैसे ट्रान्स्फर केले आणि ते चुकून आपल्याला हवे त्या खात्यात न जात दुसऱ्याच कोणाच्या खात्यात गेले, तर ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात का? याबाबत काय आहेत बँकेचे नियम, याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Banking Tips
Amazon वर उद्यापासून सुरु होणार सिक्रेट सेल, प्रत्येक वस्तू फक्त 1 रुपयात मिळेल; नेमकी काय आहे ऑफर?

तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यास, तुम्ही ते परत मिळवू शकता. यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला याची माहिती द्यावी. त्याला सर्व पुरावे द्या, जेणेकरून त्याच्यावर त्वरीत कारवाई होईल. जर त्याच बँकेच्या शाखेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले, तर बँक यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करते. (Latest Marathi News)

ज्या व्यक्तीच्या बँक खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्या व्यक्तीशी बँक संवाद साधते किंवा ईमेल करते. त्यानंतर त्या खातेदाराची परवानगी घेतल्यानंतर बँक सात दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे परत करते.

Banking Tips
Lek Ladki Yojana: PM मोदींनी शुभारंभ केलेली 'लेक लाडकी योजना' काय आहे? प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये मिळणार

ही माहितीही आहे महत्वाची

जर काही कारणास्तव दुसऱ्या व्यक्तीने तुमचे पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्या खातेदाराच्या नावावर एफआयआर दाखल करू शकता, म्हणजेच कायदेशीर मदत घेऊ शकता. कायदेशीर प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. तसेच जर खातेदार तुमच्याशी संवाद साधत असेल आणि तुमचे पैसे परत करण्यास सहमत असेल, तर बँक तुम्हाला काही संबंधित कागदपत्रांच्या प्रती सबमिट करण्यास सांगू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com