Manoj jarange Patil: 'याचिका टाकून थांबणार नाही, २० जानेवारीला १०० टक्के मुंबईत जाणार..' जरांगे पाटलांनी ठणकावले

Maratha Aarkshan: सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जरांगेंनी मुंबईत येऊन आंदोलन करू, नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

Manoj jarange Patil News:

२२ जानेवारीला मराठा बांधवांचे आंदोलन मुंबईमध्ये धडकणार असल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जरांगेंनी मुंबईत येऊन आंदोलन करू, नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत जरांगे पाटील?

"याचिका टाकून कोणीही मराठा समाजाच्या आंदोलनाला थांबवू शकत नाही. कायदा आणि लोकशाही सर्वांसाठी आहे. मराठा समाज हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी नाही तर उपोषण करण्यासाठी चालला आहे. तुम्ही शांततेत आम्हाला आंदोलन करू देणार नाही मग ही लोकशाही नाही असं घोषित करा.. "असे जरांगे पाटील (Manoj jarange Patil) म्हणालेत.

मराठा बांधव मुंबईला जाणार..

"मराठा बांधव शंभर टक्के 20 जानेवारीला आंतरवाली सोडून मुंबईत जाणार आहेत. आरक्षण सुद्धा घेऊन येणार आहेत आणि आंदोलनसुद्धा करणार, कोणीच रोखू शकत नाही. आम्हाला लोकशाहीने तो अधिकार दिला आहे. कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्या चिखलात जाणार आहेत," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Anil Gote: नकाने तलावाची खालावली पाणी पातळी; माजी आमदार अनिल गोटेंचा भाजपवर हल्लाबोल

राज ठाकरेंना उत्तर...

"जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे कुणीतरी आहे असा संशय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता. यावरही मनोज जरांगे पाटील यांनी सनसनीत उत्तर दिले आहे.. राज ठाकरेंचं बरोबर आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागे गोरगरीब मराठा समाज आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे दुसरे कोणीतरी असत तर मागेच आंदोलन मोडले असते. गोरगरीब मराठ्यांचा हा कार्यक्रम आहे इथे गोरगरीब मराठ्यांचे ताकद आहे.." असे जरांगे पाटील म्हणालेत.

Manoj Jarange Patil
Ramdas Athawale On Lok Sabha Election: रामदास आठवलेंची लोकसभा लढविण्याची इच्छा, मतदारसंघही ठरला; RPI ला हव्यात दाेन जागा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com